आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसोटी: राहुलचा शतकी दणका, कोहलीसोबत १६४ धावांची भागीदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे - युवा सलामीवीर लाेकेश राहुल (१०८), कर्णधार विराट काेहली (७८) अाणि राेहित शर्मा (७९) यांच्या संयमी खेळीच्या बळावर टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात सहा बाद ३१९ धावा काढल्या. या वेळी लाेकेश राहुल अाणि कर्णधार विराट काेहलीने तिसऱ्या गड्यासाठी १६४ धावांची भागीदारी करून टीमचा डाव सावरला. त्यामुळे निराशाजनक सुरुवातीनंतरही भारताला ३०० पार धावांपर्यंत मजल मारता अाली. अाता वृद्धिमान साहा (१९) मैदानावर खेळत अाहे. या वेळी लाेकेश राहुलने काैतुकास्पद खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भारताला पहिल्या डावात गुरुवारी सुमार खेळीमुळे चांगली सुरुवात करता अाली नाही. दाेन बाद १२ धावा असताना लाेकेश राहुलने संयमी खेळी करून संघाचा डाव सावरला. या वेळी त्याला कर्णधार विराट काेहलीची महत्त्वाची साथ मिळाली. पहिल्या कसाेटीच्या पहिल्या डावात ७ अाणि दुसऱ्या डावात ५ धावा काढणाऱ्या लाेकेशने दुसऱ्या कसाेटीचा पहिला दिवस गाजवला.
सकाळी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, विराट काेहलीचा हा निर्णय सुरुवातीलाच चुकीचा असल्याचे दिसून अाले.
सलामीवीर मुरली विजय (०) अाणि अजिंक्य रहाणे (४) स्वस्तात बाद झाले. त्यामुळे यजमान टीम पुन्हा एकदा सलामी कसाेटीतील खेळीला उजाळा देणार की काय,असेच चित्र निर्माण झाले हाेते. मात्र, अशा वेळी संकटात सापडलेल्या टीम इंडियाला सावरण्यासाठी काेहलीचा विराट अनुभव महत्त्वाचा ठरला. या वेळी त्याने स्वत: धावा काढताना लाेकेश राहुललाही महत्त्वाची साथ दिली. त्यामुळे भारतीय संघाला लंच टाइमपर्यंत दाेन बाद ९७ धावा काढता अाल्या.
राहुलच्या १०८ धावा
भारताचा युवा फलंदाज लाेकेश राहुलने कसाेटी करिअरमध्ये दुसरे शतक साजरे केले. यापूर्वी त्याने करिअरमधील पहिले कसाेटी शतक सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठाेकले हाेते. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत राहुलने १९० चेंडूंत १०८ धावा काढल्या. यात १३ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. त्याने काेहलीसाेबत दीड शतकी भागीदारी केली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संगकाराचा गौरव