आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत मजबूत स्थितीत भारताच्या पहिल्या डावात ३७५ धावा; १९२ धावांची आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाले - कर्णधार विराट कोहलीचे (१०३) अकरावे कसोटी शतक आणि सलामीवीर शिखर धवनच्या (१३४) चौथ्या कसोटी शतकाच्या बळावर श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच टीम इंडिया सुस्थितीत पोहोचली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात ३७५ धावा काढून महत्त्वपूर्ण अशी १९२ धावांची खेळी केली. यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या ५ धावांत श्रीलंकेच्या २ विकेट घेऊन सामन्यावर पकड मजबूत केली. दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाच्या बळावर कोहली ब्रिगेडने विजयाकडे आगेकूच केली आहे.
कोहली-शिखर धवन यांनी तिसऱ्या विकेटसाठी २२७ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेच्या भूमीवर तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारीची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
टीम इंडियाचा पहिला डाव ११७.४ षटकांत ३७५ धावांवर आटोपला. कोहलीच्या नेतृत्वाची प्रशंसा करावी लागेल. त्याच्या चाणाक्ष निर्णयाने दुसऱ्या डावात अवघ्या ५ धावांत श्रीलंकेचे दोन मोहरे टिपले. विराटने नव्या चेंडूने दोन्ही टोकांनी फिरकीपटूला गोलंदाजी देण्याची नवी रणनीती स्वीकारली. ही रणनीती यशस्वी ठरली.

थारिंडूची कुशलता : भारताच्या २५५ धावा झाल्या असताना विराटच्या रूपाने श्रीलंकेला पहिले यश मिळाले. कोहलीचे शतक पूर्ण होताच थारिंडूने त्याला पायचीत केले. थारिंडूने रहाणे, अश्विन, हरभजन आणि अॅरोनला बाद करून ५ विकेट घेतल्या.
धवन, कोहली तळपले
दुसऱ्या दिवशी भारताने २ बाद १२८ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. धवन ५३, तर कोहली ४५ धावांवर नाबाद होते. दोन्ही फलंदाजांनी आपली धावगती वाढवताना सलग धावा वसूल केल्या. दोघांनी शतके ठोकून श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढली. धवनने २७१ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार खेचत १३४ धावा काढल्या. विराटने १९१ चेंडूंत ११ चौकारांसह १०३ धावा गोळा केल्या. दोघांनी जेवणाच्या ब्रेकपर्यंत स्कोअर २ बाद २२७ असा पोहोचवला.

वृद्धिमान साहाची झुंज
धवनला प्रदीपने त्रिफळाचीत केले. धवननंतर वृद्धिमान साहाने ६ चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने ६० धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाचे तळाचे फलंदाज हरभजनसिंग (१४), अमित मिश्रा (१०) आणि वरुण अॅरोन (४), तर आर. अश्विन (७) यांनीही थोडे योगदान दिले.
१३४
धावा ठोकल्या सलामीवीर शिखर धवनने
१०३
धावांची खेळी केली विराट कोहलीने
धावफलक
श्रीलंका पहिला डाव १८३.
भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
लोकेश राहुल पायचीत गो. प्रसाद ०७ ०७ ०० ०
धवन त्रि. गो. प्रदीप १३४ २७१ १३ ०
राेहित शर्मा पायचीत गो. मॅथ्यूज ०९ २४ ०१ ०
कोहली पायचीत गो. कुशल १०३ १९१ ११ ०
रहाणे पायचीत गो. कुशल ०० ०५ ०० ०
साहा झे. चांदिमल गो. प्रदीप ६० १२० ०६ १
अश्विन त्रि. गो. प्रदीप ०७ ०४ ०१ ०
हरभजन त्रि. गो. कुशल १४ ३१ ०२ ०
अमित मिश्रा त्रि. गो. कुशल १० १७ ०१ ०
ईशांत शर्मा नाबाद ०३ ३९ ०० ०
अॅरोन झे.मॅथ्यूज गो. कुशल ०४ ०९ ०१ ०
अवांतर : २४. एकूण : ११७.४ षटकांत सर्वबाद ३७५ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१४, २-२८, ३-२५५, ४-२५७, ५-२९४, ६-३०२, ७-३३०, ८-३४४, ९-३६६, १०-३७५. गोलंदाजी : डी. प्रसाद २२-४-५४-१, प्रदीप २६-२-९८-३, मॅथ्यूज ०४-१-१२-१, कुशल ३२.४-२-१३४-५, हेराथ ३३-४-६७-०.
श्रीलंका दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
करुणारत्ने त्रि. गो. अश्विन ०० ०५ ०० ०
सिल्वा त्रि. गो. अमित मिश्रा ०० ०६ ०० ०
प्रसाद नाबाद ०३ ११ ०० ०
संगकारा नाबाद ०१ ०३ ०० ०
अवांतर : १. एकूण : ४ षटकांत २ बाद ५ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-०, २-१. गोलंदाजी : अश्विन २-२-०-१, अमित मिश्रा १-०-१-१, हरभजन १-०-४-०.