आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासाठी आजचा दिवस ‘बॅड डे’: कुंबळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या हंगामात सलग धावांचा पाऊस पाडणाऱ्या भारतीय संघासाठी आणि फलंदाजासाठी आजचा दिवस ‘बॅड डे’ होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावात २६० धावात गुंडाळल्यानंतर भारतीय संघाला १०५ धावसंख्येपुढे मजल मारता आली नसल्याची खंत भारतीय संघाचे प्रशिक्षक कुंबळे यांनी व्यक्त केली. 
 
ते म्हणाले, ‘संघाला असा एखादा दिवस अतिशय निराशाजनक असतो. दुर्दैवाने आज ऐन मोक्याच्या दिवशी तो निराशाजनक दिवस आला. नेहमी हात देणारी तळाची फलंदाजीही आज झटपट कोसळली.’ 
 
कुंबळ म्हणाले, कोहली व पुजारा झटपट बाद झाल्यानंतर राहुल व रहाणेने डाव सावरला होता. परंतु हे दोघे जण ६ चेंडूत परतले व डाव कोसळला. कुंबळे यांनी सांगितले, भारतीय संघासाठी पहिल्या दिवशी दोन गोष्टी मानसिकदृष्ट्या खच्ची करणाऱ्या ठरल्या. पहिल्या विकेटसाठीची ८० धावांची भागीदारी व अखेरच्या जोडीच्या ६० धावांच्या भागीदारीमुळे संघ नाउमेद झाला.
 
 त्यामुळे फलंदाजांना कौशल्य पणास लावून व एकाग्रचित्ताने फलंदाजी करावी लागणार होती. 
‘भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा याने टिच्चून गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात तर तो षटकामध्ये अनेकदा फलंदाजांना चकवत होता. एरवी त्याच चेंडूवर बॅटची कड तरी लागली असती किंवा चेंडू यष्टीवर आदळला,’असेही या वेळी प्रशिक्षक कुंबळे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...