इंदूर - भारत- साउथ आफ्रिकेदरम्यान नुकत्याच झालेल्या टी-20 सामन्यात चुकीच्या अंपायरिंगची तक्रार करणाऱ्या भारतीय संघ व्यवस्थापक विनोद फडके यांना आयसीसीने मॅच फीसचा 40 टक्के दंड ठोठावला आहे. अंपायर विनीत कुलकर्णीच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याबद्दल फडकेंविरोधात कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची सुनावणी इंदूर मॅचनंतर होणार होती.
टीम इंडियाने विनीतच्या विरोधात तक्रार करण्याचा निर्णय केला आहे.
फडके काय म्हणाले होते
दोन टी-20 आणि पहिला वनडे सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने अंपायर विनीत कुलकर्णीविरोधात नाराजी व्यक्त केली होती. एका क्रिकेट वेबसाइटच्या वृत्तानूसार टीम इंडियाचे मॅनेजर विनोद फडके म्हणाले होते, 'या सीरिचनंतर तुमच्या वादग्रस्त निर्णयांविरोधात तक्रार केली जाईल. मी कर्णधाराचा अहवाल पाहिला नाही मात्र माझ्या रिपोर्टमध्ये मी याची तक्रार करणार आहे.' विनोद फडकेंना गांधी-मंडेला सीरिजसाठी टीम इंडियाचा मॅनेजर नियुक्त करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दोन अपील