आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND v AUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर 37 धावांनी दणदणीत विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 37 धावांनी पराभूत केले आहे. 189 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 ओव्हरमध्ये 151 धावांवर ऑलआउट झाला. अश्विन, जडेजा, आणि पंड्याने दोन-दोन विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने विराट कोहलीच्या 90* धावांच्या बळावर तीन विकेट गमावत 188 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाची इनिंग
- एरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने संघाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 47 धावा काढल्या.
- ऑस्ट्रेलियाला पहिला झटका जसप्रीत बुमराहने दिला. जसप्रीतने 11 धावांवर डेव्हिड वॉर्नरला बाद केले.
- ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका स्टीव्हन स्मिथच्या रुपात लागला. स्मिथला रविंद जडेजाने 21 धावांवर बाद केले.
- ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका आर. अश्विनने दिला. कर्णधार फिंच 44 धावांवर lbw बाद झाला.
- चौथ्या विकेटच्या रुपात ट्रेविस हेड (2) तंबूत परतला. त्यानंतर शेन वॉटसन (12) आणि लीन (17) लगेच बाद झाले.
- शेवटच्या चार ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट पडल्या आणि 151 धावांवर सर्व संघ बाद झाला.
- जसप्रीत बुमराह भारताचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने तीन विकेट घेतल्या.
- आर. अश्विन, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने दोन-दोन विकेट घेतल्या. आशिष नेहराने एक विकेट घेतली.
धावफलक (Australia)
खेळाडू रन बॉल 4 6
एरॉन फिंच lbw अश्विन 44 33 4 2
डेव्हिड वॉर्नर कॅ. विराट बॉ. बुमराह 17 9 2 1
स्टीव्हन स्मिथ कॅ. विराट बॉ. जडेजा 21 14 3 0
ट्रेविस हेड lbw जडेजा 2 5 0 0
क्रिस लीन कॅ. युवराज बॉ. पांड्या 17 16 0 1
शेन वॉटसन कॅ. नेहरा बो. अश्विन 12 10 0 1
मॅथ्यू वेड कै. जडेजा बो. पांड्या 5 7 0 0
जेम्स फॉकनर बॉ. बुमराह 10 7 0 1
केन रिचर्डसन बॉ. नेहरा 9 7 0 0
कॅमरून बॉयस कॅ. पांड्या बो. बुमराह 3 6 0 0
शॉन टेट not out 1 3 0 0
भारताची इनिंग
- टीम इंडियाला पहिला झटका शेन वॉटसनने दिला. वॉटसनने चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर रोहित शर्माला 31 धावांवर बाद केले,
- याच ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर वॉटसनने शिखर धवनलाही तंबूत पाठवले. धवनने 5 धावा केल्या. रोहित-धवनने पहिल्या विकेटसाठी 40 धावा केल्या.
- विराट कोहलीने सुरुवातीपासूनच दमदार फलंदाजी करत 90* धावा काढल्या. सुरेश रैनाने टी-20 मध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या.
- दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 14.3 ओव्हरमध्ये 134 धावांची भागीदारी केली.
- शेवटच्या ओव्हरमध्ये सुरेश रैना (41)ला फॉकनरने बाद केले.
धावफलक (India)
खेळाडू रन बॉल 4 6
रोहित शर्मा कॅ. फॉकनर बॉ. वॉटसन 31 20 4 1
शिखर धवन कॅ. वेड बॉ. वॉटसन 5 8 0 0
विराट कोहली not out 90 55 9 2
सुरेश रैना बॉ. फॉकनर 41 34 3 1
एमएस धोनी not out 11 3 1 1

दोन्ही संघात या खेळाडूंचा समावेश
- ऑस्ट्रेलियाने शॉन टेट आणि शेन शेन वॉटसन यांचा संघात समावेश केला आहे. ट्रेविस हेड आणि क्रिस लियोन यांनाही संघात जागा मिळाली आहे.
- भारतीय संघात युवराजसिंग, सुरेश रैना, आशिष नेहरा यांचे पुनरागमन झाले आहे. हार्दिक पंड्या येथे आपला पहिला टी20 सामना खेळत आहे.
- स्पिनर्समध्ये आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान मिळाले आहे.
टीम
भारत : एमएस धोनी (कर्णधार)), युवराजसिंग, रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या।

ऑस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, क्रिस लियोन, ट्रेविस हेड, शेन वॉटसन, मॅथ्यू वेड, जेम्स फॉकनर, केन रिचर्ड्सन, शॉन टेट, कॅमरून बॉयस.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सामन्यातील काही खास फोटो...