आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INDvsAUS: भारताने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियात प्रथमच T20 मालिका विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर जल्लोष करताना धोनी. - Divya Marathi
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर जल्लोष करताना धोनी.
मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या T 20 सामन्यात पराभव करत भारताने तीन सामन्यांची ही मालिका जिंकली आहे. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 185 धावांचे आव्हान करताना सुरुवातीच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर कांगारुंचा संघ पुन्हा पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला. भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत भारताला 27 धावांनी विजय मिळवून दिला.
अॅरॉन फिंचने तडाखेबाज फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 27 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. पण 10 व्या षटकात मार्शला 23 धावांवर बाद केल्यानंतर भारताने लिनलाही लगेचच बाद झाला. त्यानंतर आलेल्या हिटर ग्लेन मॅक्सवेलही आल्या पावली परतला. वॅटसन, फिंच आणि फॉकनरही त्याच्या मागे लगेचच पॅव्हेलियनमध्ये परतले. अश्विन, युवराज आणि हार्दिक पांड्या तिघांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. तर जडेजाचे दोघांना बाद केले. फिंच रनआऊट झाला. त्यानंतर भारताने कांगारुंना पुन्हा डोके वर काढू दिले नाही. 20 षटकांत 8 बाद 157 धावांवर कांगारुंचा डाव आटोपला.
त्याआधी भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी सुरुवातीला सावध खेळ केला. त्यानंतर फटकेबाजी करत भरपूर धावा कुटल्या. दहा षटकांत टीम इंडियाने 84 धावा केल्या. मात्र फटकेबाजी करताना धवन 42 धावांवर बाद झाला. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर लिनने धवनचा झेल घेतला. रोहित शर्माने मात्र फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. धवन बाद झाल्यानंतर आलेल्या कोहलीनेही मैदानावर उतरताच त्याच्या शैलीत फटकेबाजी सुरू केली. त्याने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. धोनी 14 धावांवर बाद झाला.
धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात 37 धावांनी विजय मिळवला होता. आशीष नेहरा, सुरेश रैना, युवराज सिंग आणि जसप्रित बुमराह यांच्या आगमनाने भारतीय टीम अधिक स्ट्राँग बनली आहे.

युवीच्या ब्लास्टची प्रतीक्षा...
- सुपरस्टार बॅट्समन विराट कोहलीच्या नॉट आऊट 90 धावांच्या इनिंगच्या जोरावर युवराजला खेळायची संधी मिळू शकली नव्हती.
- त्यामुळे याठिकाणी खेळण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न युवी करेल. या मालिकेतील कामगिरीच्या जोरावरच युवराजची टी 20 वर्ल्ड कपमध्ये निवड होऊ शकते.
- पहिल्या सामन्यात युवराजने एक ओव्हर गोलंदाजी केली होती. त्यात त्याने 10 धावा दिल्या होत्या.
- भारताच्या टीमने यापूर्वी झालेल्या 3 पैकी एक तर ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 2 सामन्यांत विजय मिळवला आहे.

मॅक्सवेलचे पुनरागमन
- ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. तर स्मिथ आणि वॉर्नरला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
- स्मिथ आणि वॉर्नरला कसोटीच्या सरावासाठी न्यूझीलंडला पाठवले आहे.

टी-20 मध्ये भारत v ऑस्ट्रेलिया
- आतापर्यंत दोनही देशांमध्ये 10 टी-20 सामने झाले. त्यात 6 सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने 4 सामने जिंकले आहेत.
- ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ऑस्ट्रेलियात भारताने चार टी 20 सामने खेळले त्यापैकी दोन जिंकले.

टीम
भारत
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, एमएस धोनी, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रित बुमराह आणि आशिष नेहरा.

ऑस्ट्रेलिया
अॅरॉन फिंच, शॉन मार्श, क्रिस लीन, ग्लेन मॅक्सवेल, शेन वॉटसन, मॅथ्यू वेड, फॉकनर, हेस्टिंग्स, बोलांड, नाथन ल्योन आणि अँड्यू टाय.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचे PHOTOS