आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Tour Of West Indies, 2nd Test, 3rd Day At Kingston, Jul 30 Aug 3, 2016

IND vs WI: अजिंक्य रहाणेच्या शतकाने भारताचा धावांचा डोंगर, 304 धावांची आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंक्य रहाणेंनी नाबाद 108 धावा काढताना 13 चौकार आणि तीन षटकार ठोकले. - Divya Marathi
अजिंक्य रहाणेंनी नाबाद 108 धावा काढताना 13 चौकार आणि तीन षटकार ठोकले.
किंग्स्टन- टीम इंडियाने दुसर-या कसोटीत तिस-या दिवशी आपला पहिला डाव 9 बाद 500 धावांवर घोषित केला. यामुळे भारताने वेस्ट इंडिजवर 304 धावांची मजबूत आघाडी घेतली. मात्र, जोरदार पावसामुळे तिस-या दिवसाचा अर्ध्या दिवसाचा खेळ वाया गेला. भारताकडून अजिंक्य रहाणेंने नाबाद 108 धावा काढून करिअरमधील सातवे शतक ठोकले. यजमान वेस्ट इंडिज संघाला भारताने पहिल्याच दिवशी 196 धावांत गुंडाळले होते. आता दोन दिवस बाकी असून, पावसाने 'खेळ' केला नाही तर भारत पहिल्या कसोटीप्रमाणे डावाने विजय मिळविण्याच्या मार्गावर आहे. काय घडले तिस-या दिवशी...
- भारताने तिस-या दिवशी सकाळी 5 बाद 358 धावेवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. खेळ सुरु होताच काही मिनिटांतच अजिंक्य रहाणेने अर्धशतक पूर्ण केले.
- तिस-या दिवशी भारताच्या खात्यात 67 धावा काढून रिद्धिमान साहा बाद झाला. साहा बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या होती 6 बाद 425.
- यानंतर रहाणेने अमित मिश्राला सोबत भारताची धावसंख्या 500 च्या घरात जाईल याकडे लक्ष दिले. मात्र, 458 संघाची धावसंख्या असताना मिश्रा बाद झाला. यानंतर याच धावसंख्येवर मोहम्मद शमी (0) वर बाद झाला.
- यादरम्यान रहाणेने आपल्या करिअरमधील सातवे शतक पूर्ण केले. उमेश यादव मोठे शॉट खेळून वेगाने धावा काढण्याच्या प्रयत्नात होता. त्याने 14 चेंडूत 4 चौकारासह 19 धावा केल्या व फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला.
- उमेश यादव 500 धावसंख्येवर बाद झाला होता. यादव बाद होताच विराटने भारताचा डाव घोषित केला.
- तिस-या दिवशी वेस्ट इंडीजच्या रोस्टन चेसने 3 विकेट घेतल्या. त्याने एकून 5 विकेट घेतल्या.
गावसकर, मंकड यांच्या क्लबमध्ये राहुल

- राहुलने सबिना पार्क मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या डावात 158 धावा काढल्या. हे त्याच्या कारकीर्दीतील तिसरे शतक आहे.
- राहुलने सलामीवीर म्हणून आपली तिन्ही शतके विदेशात झळकावली. अशी कामगिरी फक्त गावसकर आणि विनू मंकड यांनाच करता आली आहे.
- भारताचा युवा फलंदाज लोकेश राहुलने यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाविरुद्ध शतक झळकावले.
- गावसकर यांनी आपले सुरुवातीची आठ शतके विदेशात झळकावली होती, तर मंकड यांनी तीन शतके विदेशात ठोकल्याची नोंद आहे.
आत्मविश्वास वाढला
- दोन महिन्यांपासून मी सलगपणे कामगिरी करतोय. माझी ही लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन.
- तिन्ही स्वरूपात चांगले प्रदर्शनाचा माझा प्रयत्न असेल. यामुळे निश्चितपणे माझा आत्मविश्वास वाढला आहे.
- मी यापुढेसुद्धा योगदान देत राहणार असे सलामीवीर लोकेश राहुल याने सांगितले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, काय काय घडले तिस-या दिवशी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...