आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Tour Of West Indies, 2nd Test, 4th Day At Kingston, Jul 30 Aug 3, 2016 Update

IND vs WI: चौथ्या दिवशी पावसाचाच \'खेळ\'! वेस्ट इंडिज पुन्हा डावाने पराभवाच्या दिशेने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंडिजला लागोपाठ दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलण्याचे काम केले. - Divya Marathi
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंडिजला लागोपाठ दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलण्याचे काम केले.
किंगस्टन- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुस-या कसोटीत चौथ्या दिवशी पावसानेच खेळ केला. चौथ्या दिवशी जेमतेम 16 षटके टाकली गेली. यात भारताने इंडिजचे चार फलंदाज माघारी धाडून पुन्हा एकदा डावाने विजयाकडे आगेकूच केली आहे.
चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजची 4 बाद 48 अशी नाजूक अवस्था झाली असून, डावाने पराभव टाळण्यासाठी अजून त्यांना तब्बल 256 कराव्या लागणार आहेत. तर भारताला इंडिजचे केवळ 6 फलंदाज बाद करायचे आहेत. पावसाने घोळ घातला नसता तर भारताने पहिल्या कसोटीप्रमाणेच चौथ्या दिवशीच ही कसोटीही खिशात घातली असती. पावसाने इंडिजचा पराभव एक दिवस पुढे ढकलला आहे. आता पाचव्या दिवशी वरूणराजा काय करतो याकडे भारतीय संघाचे लक्ष आहे. किंगस्टन कसोटी जिंकून 2-0 अशी आघाडी घ्यायला विराट सेना उत्सुक आहे. काय घडले चौथ्या दिवशी...
- चौथ्या दिवशी पावसामुळे एक तास खेळ उशिरा सुरु झाला.
- त्यानंतर 3 षटके टाकली नाहीत तोच पावसाने पुन्हा सुरूवात केली.
- या तीन षटकात इशांत शर्माने सलामीवीर चंद्रिकाला 1 धावेवर त्रिफळाचित केले.
- यानंतर तब्बल दोन तासाने खेळ सुरु झाला.
- 12 व्या षटकात अमित मिश्राने ब्रेथवेटला 23 धावांवर राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले.
- त्यानंतर मोहम्मद शमीने वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के सॅम्युअल्स (0) आणि ब्राव्हो (20) यांना माघारी धाडले.
- पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ब्लॅकवूड 3 धावांवर नाबाद होता.
पावसामुळे भारताची निराशा -
- पावसाच्या व्यत्ययामुळे खेळाला उशिरा सुरुवात झाली. चौथ्या दिवशी यजमान विंडीज टीमची सुरुवात निराशाजनक झाली.
- खडतर आव्हानाच्या प्रत्युत्तरात विंडीज टीमला दुसऱ्या डावात दुस-याच षटकात पहिला झटका बसला.
- सलामीवीर चंद्रिका (1) आाल्यापावलीच तंबूत परतला. त्याला ईशांतने बाद केले.
- तो सलग दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. त्याला समाधानकारक खेळी करता आली नाही. त्याने पहिल्या डावात अवघ्या 5 धावांचे योगदान दिले होते. त्यापाठोपाठ सलामीवीर ब्रेथवेट (23), डॅरेन ब्राव्हो (20) आणि मार्लोन सॅम्युअल्स (0) झटपट बाद झाले.
- पाऊस आला नसता तर भारताने चौथ्या दिवशीच दिमाखात विजय मिळवला असता. आता इंडिजचा पराभव व भारताचा विजय एक दिवसाने पुढे ढकलला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, चौथ्या दिवसाची क्षणचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...