आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Tour Of West Indies, 2nd Test, 5th Day At Kingston, Jul 30 Aug 3, 2016 Update

IND vs WI: इंडिजच्या मिडल ऑर्डरमुळे भारताचा विजय हुकला, दुसरी कसोटी ड्रॉ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसरी कसोटी हातातून जात असल्याने भारतीय खेळाडू असे निराश दिसत होते. अमित मिश्राने शेरिन डोरिकला (74) बाद केल्यानंतर भारतीय खेळाडू चिंताग्रस्तच होते. - Divya Marathi
दुसरी कसोटी हातातून जात असल्याने भारतीय खेळाडू असे निराश दिसत होते. अमित मिश्राने शेरिन डोरिकला (74) बाद केल्यानंतर भारतीय खेळाडू चिंताग्रस्तच होते.
किंगस्टन- वेस्ट इंडिजच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांची शानदार बॅटिंग आणि चौथ्या दिवशी पावसाने केलेला खेळ यामुळे दुस-या कसोटीत भारत विजयापासून दूर राहिला. इंडिजच्या रोस्टन चेसने नाबाद शतक ठोकत त्याने संघाचा पराभव टाळला. रोस्टनला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. शेवटच्या दिवशी भारत विजयापासून केवळ 6 विकेट दूर होता. मात्र, पाचव्या दिवशी संपूर्ण दिवसाचा खेळ होऊनही भारत दोन विकेटच घेऊ शकला. शेवटच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिजने 6 बाद 388 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 196 धावांत रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात 9 बाद 500 धावसंख्येवर आपला डाव घोषित केला होता. असा राहिला पाचव्या दिवसाचा खेळ...
- इंडिजकडून पाचव्या दिवशी रोस्टन चेस, जरमॅन ब्लैकवुड, शेन डोरिक आणि जेसन होल्डर यांनी शानदार बॅटिंग केली.
- यादरम्यान रोस्टन चेसने नाबाद 137 धावा काढत आपल्या करिअरमधील पहिले शतक ठोकले.
- तर ब्लॅकवुड (63), शेन डोरिक (74) आणि कर्णधार जेसन होल्डरने नाबाद 64 धावा काढत संघाला पराभवातून बाहेर काढले.
- मॅचच्या शेवटच्या दिवशी भारताकडे 256 धावांची आघाडी होती तर त्यांना इंडिजचे 6 गडी बाद करायचे होते.
- अशा वेळी मिडल ऑर्डरवर दोहरी जबाबदारी होती. त्यांना केवळ आपल्या विकेट्स टिकवायच्या नव्हत्या तर धावाही काढायच्या होत्या.
- पाचव्या दिवशी इंडिजच्या फलंदाजांनी वेगाने धावा काढत भारताची आघाडी भरून काढत 92 धावा अधिकच्या जोडल्या.
- यादरम्यान, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी फलंदाजांना बाद करण्याचा खूप प्रयत्न केला व त्यांचे ते प्रयत्न तोकडे पडले.
मिडल ऑर्डरने केली कमाल-
- पाचव्या दिवशी जरमॅन ब्लॅकवुड आणि रोस्टन चेसने वेस्ट इंडीजला शानदार सुरुवात करून दिली.
- बुधवारी ब्लॅकवुड (63) बाद होणारा पहिला फलंदाज होता. त्याला रविचंद्रन अश्विनने पुजाराकडे झेलबाद केले.
- त्यावेळी इंडिज संघाचा स्कोर होता 33.3 षटकात 5 बाद 141 असा. यानंतरची विकेट घेण्यासाठी भारताला खूप संघर्ष करावा लागला. - यानंतर दिवसभरात दुसरी व शेवटची विकेट पडली ती शेन डोरिक याची. त्याला अमित मिश्राने lbw केले.
- डोरिक बाद झाला तेव्हा इंडिजचा स्कोर 71.4 षटकात 6 बाद 285 धावा असा होता.
- त्याआधी चौथ्या दिवसअखेर इंडिजने 4 बाद 48 धावा केल्या होत्या.
- खेळ संपला तेव्हा रोस्टन चेस नाबाद 137 आणि जेसन होल्डर नाबाद 64 धावांवर होते.
अष्टपैलू कामगिरीमुळे चेस बनला MOM
- मॅचच्या पाचव्या दिवशी रोस्टन चेसने आपल्या कसोटी करिअरमधील पहिले शतक ठोकले.
- चेसने या मॅचमध्ये नाबाद 137 धावा केल्या. यादरम्यान त्याने 15 चौकार आणि एक षटकार ठोकला.
- याशिवाय चेसने भारताच्या पहिल्या डावात 121 धावा देत पाच विकेट घेतल्या होत्या.
- त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच' घोषित केले.
अशी राहिली पार्टनरशिप

- पाचव्या विकेटसाठी- 93 धावा (ब्लॅकवुड-चेस)
- सहाव्या विकेटसाठी- 144 धावा (चेस-डोरिक)
- सातव्या विकेटसाठी- नाबाद 103 धावा (चेस- होल्डर)
मॅच समरीः

वेस्ट इंडिज- 196 आणि 6 बाद 388.
भारत- 500/9 घोषित
निकाल- कसोटी ड्रॉ
पुढे स्लाईडद्वारे पाहा, पाचव्या दिवशी नेमके काय काय घडले....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...