आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेव टी-20 मध्ये विंडीजचा एकतर्फी विजय, टीम इंडियाची अशी उडाली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात रविवारी रात्री झालेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये भारताचा 9 विकेटनी दारूण पराभव झाला. विंडीजचा सलामीवीर इविन लुईसने नाबाद झंझावती 125 धावा ठोकत भारताचा एकतर्फी पराभव केला. ज्यानंतर सोशल मीडियात पुन्हा एकदा इंडियन प्लेयर्सची जोरदार खिल्ली उडविली.  विराट आणि जडेजा तसेच मॅचमध्ये खराब कामगिरी करणा-या खेळाडूंची क्रिकेट फॅन्सच्या निशाण्यावर आले. सोबतच फॅन्सने त्या खेळाडूंची आठवण काडली जे सध्या टीममध्ये नाहीत. असा झाला टीम इंडियाचा पराभव....
 
- वन डे मालिका पराभवातून सावरलेल्या यजमान वेस्ट इंडीजने रविवारी एकमेव टी-20 सामन्यात टीम इंडियाला धूळ चारली. 
- यजमान विंडीजने घरच्या मैदानावर 9 गड्यांनी सामना जिंकला. सलामीवीर इव्हिन लेविसच्या (125) झंझावाती नाबाद शतकाच्या बळावर विंडीजने सहज विजयश्री खेचून आणली. 
- यासाठी मार्लोस सॅम्युअल्सने नाबाद 36 आणि स्फोटक फलंदाज क्रिस गेलने 18 धावांचे योगदान दिले.
- टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 190 धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये यजमान विंडीजने एका गड्याच्या मोबदल्यात 18.3 षटकांत लक्ष्य गाठले. 
- धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला सलामीवीर क्रिस गेल आणि लेविसने दमदार सुरुवात करून दिली. 
- या दोघांनी संघाला 82 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर लेविस व सॅम्युअल्सने विजयश्री खेचून आणली.
- तत्पूर्वी,भारताकडून विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने सर्वाधिक 48 धावांचे योगदान दिले. युवा खेळाडू ऋषभ पंतने 38 धावा काढल्या. 
- वेस्ट इंडीजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून कोहली (39) आणि धवन (23) यांनी 5.3 षटकांत 64 धावांची सलामी दिली. कोहलीने 22 चेंडूंत 1 षटकार, 7 चौकारांसह 39 धावा काढल्या.
 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टी-20 मॅचमध्ये टीमच्या पराभवानंतर सोशल मीडियात आलेल्या कशा- कशा कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...