आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Tour Of Zimbabwe, 1st ODI Live From Harare

#Ind vs Zim : हरारेत जिंकले, राहणेच्या कर्णधारपदाची \'अजिंक्य\' सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - येथे सुरू असलेल्या पहिल्या वन डे सामन्यात झिम्बाब्वेचा 4 धावांनी पराभव करत भारतानेदौऱ्याची विजयी सुरुवात केली आहे. तसेच या विजयाबरोबरच राहणेच्या कर्णधारपदाचीही विजयाने सुरुवात झाली आहे. झिम्बाब्वेने सहा विकेट गमावल्याने सामना भारताच्या बाजुने झुकला असे वाटत होते. पण कर्णधार चिगंबुराने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगवला. त्याने शतकी खेळी केली.
भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर दबाव ठेवला. कर्णधार चिगंबुरा वगळता एकाही फलंदाजाला फारशी चांगली खेळी करता आली नाही. चिगंबुराने शतकी खेळी केली. तर सिकंदर रझा (37) ने त्याला चांगली साथ दिली. भारताच्या अक्षर पटेल, भुवनेश्वर आणि बिन्नी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भज्जीला एक बळी मिळाला.
त्याआधी झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. भारताने झिम्बाब्वेसमोर 256 धावांचे आव्हान ठेवले होते. त्यात 124 धावांची शतकी खेळी करणाऱ्या रायडूचा मोलाचा वाटा होता. स्टुअर्ट बिन्नी (77) आणि अजिंक्य राहणे (34) यांनी त्याला चांगली साथ दिली. झिम्बाब्वेच्या त्रिपानो आणि छिभाभा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
गेल्या काही दिवसांत जबरदस्त फॉर्मात असलेल्या अजिंक्य राहणेच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघाला ऐतिहासिक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. खेळाडू थकलेले असल्याने दौरा रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. पण बीसीसीआयने नंतर वरिष्ठांना विश्रांती देत नव्या दमाच्या संघाला झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठवले.