हरारे- आयपीएलच्या दिग्गज खेळाडूंनी सजलेल्या टीम इंडियाला कमी अनुभव असलेल्या झिम्बाब्वेने पहिल्या टी-२० सामन्यात धावांनी हरवले. या विजयासह झिम्बाब्वेने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. झिम्बाब्वेने टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा भारताला हरवले. प्लेअर ऑफ मॅचचा मानकरी एल्टन चिगुम्बुरा (नाबाद ५४) ठरला.
भारताला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी धावांची गरज होती. मात्र, जगातला सर्वश्रेष्ठ फिनिशर कर्णधार महेंद्रसिंग धोनी या चेंडूवर चौकार मारू शकला नाही. झिम्बाब्वेने सामना जिंकताच त्यांचे खेळाडू आणि चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत बाद १७० धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताला बाद १६८ धावाच काढता आल्या.
पाच नव्या खेळाडूंसह मैदानावर उरतलेल्या टीम इंडियाला अखेरच्या षटकात विजयासाठी धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर धोनीने एक धाव काढली. यानंतर दुसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलला नेविल मॅडझिवाने मसकदजाकरवी झेलबाद केले. तिसऱ्या चेंडूवर धोनीने एक, तर पाचव्या चेंडूवर ऋषी धवनने धाव घेतली. यानंतर अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी धावांची गरज होती. मात्र, धोनीचा “फिनिशिंग टच’ या सामन्यात दिसला नाही. अखेरच्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि भारताचा धावांनी पराभव झाला.
सलामीवीर लोकेश राहुल पहिल्याच चेंडूवर तिरिपानोच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर अंबाती रायडू आणि मनदीप सिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५.४ षटकांत ४४ धावांची भागीदारी केली. रायडूला (१९) चिभाभाने त्रिफळाचीत केले. मनदीपसिंगने २७ चेंडूंत ३१ धावा काढल्या. यानंतर केदार जाधव (१९) आणि मनीष पांडे (४८) यांनी चौथ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेकडून चिगुम्बुराने सर्वाधिक नाबाद ५४ धावा ठोकल्या. मसकदजाने २५, चिभाभाने २०, वॉलरने ३० धावांचे योगदान दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्यातील फोटो..