आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Tour Of Zimbabwe, 2nd T20I: Zimbabwe V India At Harare, Jun 20, 2016

IND vs ZIM: 10 गडी राखून भारताचा शानदार विजय, झिम्‍बाब्‍वे 99 वर बाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - "प्लेअर ऑफ द मॅच' बरिंदर सरण (४ विकेट)च्या धारदार गोलंदाजीनंतर सलामीवीर मनदीप सिंगचे अर्धशतक (नाबाद ५२) आणि लोकेश राहुलच्या (नाबाद ४७) खेळीच्या बळावर भारताने मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान झिम्बाब्वेला १० विकेटने हरवले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी केली. पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेने २ धावांनी निसटता विजय मिळवला होता. टी-२० क्रिकेटमध्ये भारताने प्रथमच १० विकेटने विजय मिळवला,हे विशेष. दोन्ही संघांतील तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना बुधवारी २२ जून रोजी होईल. त्या सामन्यातील विजेता मालिका जिंकेल.

झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेमरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला अवघ्या ९९ धावांवर रोखले. यानंतर भारतीय फलंदाजांनी एकही विकेट न गमावता १३.१ षटकांत १०३ धावा काढून विजय मिळवला. झिम्बाब्वेला ९९ धावांत गुडाळण्यात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज बरिंदर सरणचे योगदान महत्त्वाचे ठरले. बरिंदर सरणने ४ षटके गोलंदाजी करताना १० धावाच दिल्या. सरणने टी-२० च्या हाणामारीच्या खेळात तब्बल १८ चेंडू निर्धाव टाकले. त्याच्या गोलंदाजीवर केवळ एकच चौकार बसला. झिम्बाब्वेकडून पी. मूरने सर्वाधिक ३१ धावा काढल्या. सरणशिवाय भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने चमक दाखवली. बुमराहने ११ धावांत ३ गडी बाद केले.

राहुल-मनदीपची शतकी भागीदारी
भारताकडून सलामीवीर के.एल. राहुल (४७) आणि मनदीपसिंग (५२) यांनी १०३ धावांची अभेद्य शतकी भागीदारी केली. दोघांनी १० विकेट आणि ४१ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. राहुलने ४० चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि २ चौकार मारले. तर मनदीपने ४० चेंडूंत १ षटकार, ६ चौकारांसह नाबाद ५२ धावा ठोकल्या. झिम्बाब्वेची फलंदाजी, गोलंदाजी सुमार ठरली. त्यांचे क्षेत्ररक्षणही गचाळ ठरले. झिम्बाब्वेने मनदीपला २३ धावांवर जीवदान दिले.

गोलंदाजामुळे विजय
या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी सामना सोपा केला. वेगवान गोलंदाजांनी मैदान गाजवले. आम्ही सुरुवात चांगली केली अाणि शेवटही गोड केला. पुढच्या सामन्यात असेच प्रदर्शन कायम ठेवण्याचे आव्हान असेल. - महेंद्रसिंग धोनी, विजयानंतर.

खेळपट्टीवर चेंडू वळत होता याचा मला फायदा झाला. माझ्यावर पदार्पणाचा दबाव नव्हता. मी नैसर्गिक खेळ खेळलो. अचूक टप्प्यावर जोर दिला. - बरिंदर सरण, सामनावीर.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सामन्‍यातील फोटो..
बातम्या आणखी आहेत...