आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Tour Of Zimbabwe, 3rd ODI: Zimbabwe V India At Harare, Jun 15, 2016

टीम इंडियाने दिला यजमान झिम्बाब्वेला \'व्हाइटवॉश\'! मालिका 3-0 ने जिंकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे- वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (४ विकेट) आणि सलामीवीर लोकेश राहुल (६३*) व फैज फजलच्या (५५*) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या वनडेतही टीम इंडियाने झिम्बाब्वेला १० विकेटने हरवले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ४२.२ षटकांत सर्वबाद १२३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने २१.५ षटकांत बिनबाद १२६ धावा काढून विजय मिळवला. फैज फजलने विजयी चौकार मारला. या विजयासह टीम इंडियाने झिम्बाब्वेला ३-० ने क्लीन स्वीप दिला. आता दोन्ही देशांत टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला टी-२० सामना १८ जून रोजी हरारेत होईल.

झिम्बाब्वेला संपूर्ण ५० षटकेसुद्धा खेळता आली नाहीत. त्यांचा डाव ४२.२ षटकांतच १२३ धावांत आटोपला. झिम्बाब्वेकडून सिबांदाने ३८ आणि चिभाभाने २७ धावा काढल्या. इतरांनी निराशा केली.

तिसऱ्यांदा क्लीन स्वीप
भारताने सलग तीन मालिकांत झिम्बाब्वेला क्लीन स्वीप दिला. भारताने २०१३ मध्ये झिम्बाब्वेला ५-० ने, तर २०१५ मध्ये ३-० ने हरवले होते. आता ही मालिका ३-० ने जिंकून सलग तिसऱ्या मालिकेत क्लीन स्वीप देण्याचा पराक्रम भारताने केला.

धोनीची रणतुंगाशी बरोबरी : कर्णधार म्हणून सर्वाधिक १९४ सामने खेळून महेंद्रसिंग धोनीने श्रीलंकेच्या रणतुंगाचा (१९३) विक्रम मोडला.

२० महिन्यांनी विजय
धोनीच्या नेतृत्वात भारताने तब्बल २० महिन्यांनंतर वनडे मालिका जिंकली. याआधी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ मध्ये वेस्ट इंडीजला २-१ ने हरवले होते. त्यानंतर भारतात आलेल्या श्रीलंकेला टीम इंडियाने कोहलीच्या नेतृत्वाखाली ५-० ने हरवले होते. त्यानंतर २०१५ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर गेेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेने केले होते.

मालिकेत भारताच्या फक्त ३ विकेट
यजमान झिम्बाब्वेला संपूर्ण मालिकेत भारताचे केवळ ३ फलंदाज बाद करता आले. झिम्बाब्वेने या मालिकेत ३ सामन्यांत ३० विकेट गमावून एकूण ४१७ धावा काढल्या. दुसरीकडे भारताने ३ सामन्यांत ३ विकेट गमावून ४२८ धावा ठोकल्या.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सामन्‍यातील काही फोटो..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...