मिरपूर - अनमोलप्रीत सिंग (७२) आणि सरफराज खान (५९) यांची शानदार फलंदाजी आणि डावखुरा फिरकीपटू मयंक डागरची (२१ धावांत ३ विकेट) घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने १९ वर्षांखालील वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये भारताने श्रीलंकेला ९७ धावांनी हरवले. भारताने विक्रमी पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने तीन वेळा विजेतेपद जिंकले असून एक वेळा उपविजेता राहिला आहे.
आता ११ फेब्रुवारी रोजी बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलच्या विजेत्या भारत १४ फेब्रुवारी फायनलमध्ये लढेल.
भारताने ५० षटकांत ९ बाद २६७ धावा काढल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपल्या स्कोअरचा बचाव करून श्रीलंकेला ४२.४ षटकांत १७० धावांत गुंडाळत फायनल प्रवेश केला.
अनमोलप्रीत चमकला : भारताच्या डावात अनमोलप्रीतने ९२ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि १ षटकार मारत ७२ धावांची खेळी केली. सरफराज खानने ७१ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार अाणि १ षटकार मारत ५९ धावा कुटल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेच्या डावात कामिंडू मेंडिसने सर्वाधिक ३९ धावा काढल्या. शामू अशानने ३८ धावांचे योगदान दिले. भारताकडून आवेश खानने ९ षटकांत ४१ धावांत २ विकेट, मयंक डागरने ५.४ षटकांत २१ धावांत ३ विकेट घेतल्या.
भारताचे सर्वाधिक विजय : भारतीय युवा संघाने विक्रम करताना अातापर्यंत एकूण ७० सामने खेळले आहेत. यात भारताने विक्रमी ५२ सामने जिंकले आहेत.
वेगवान अर्धशतक : वेगवान अर्धशतकाचा विक्रम भारताच्या ऋषभ पंतच्या नावे आहे. त्याने याच वर्ल्डकपमध्ये नेपाळविरुद्ध १८ चेंडूंत ५० धावा काढल्या. ऋषभ पंत युवा संघाचा सलामीवीर आहे.
पाकची केली बरोबरी
भारताने विक्रमी पाचव्यांदा फायनलमध्ये पोहोचून पाकच्या विक्रमाची बरोबरी केली. पाकने आतापर्यंत पाच वेळा फायनल गाठले असून दोन वेळा विजेतेपद तर ३ वेळा उपविजेतेपद मिळवले. भारताने ३ वेळा बाजी मारली.
६७ विविध देशांच्या क्रिकेटपटंूनी २००० च्या अंडर-१९ पासून सीनियर संघात स्थान मिळवले.
०३ अंडर-१९ खेळाडू लारा, इंझमाम, सनथ जयसूर्या यांनी सीनियर वनडेत १० हजार पेक्षा अधिक धावा काढल्या.
१३ अंडर-१९ च्या गोलंदाजांनी कसोटी पदार्पणात ५ विकेट घेतल्या.
०४ खेळाडूंनी अंडर-१९ नंतर कसोटी पदार्पणात शतक ठोकले. यात गुप्तिलचा आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मॅचचे रोमहर्षक क्षण