आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहलीचा \'विराट\' पराक्रम, सर डॉन ब्रॅडमनच्या रेकॉर्डची बरोबरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - कसोटी कारकीर्दीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची दमदार कारकीर्द रविवारी आणखी उजळून निघाली. बांगला देशविरुद्धच्या एकमेव कसोटीत २०८ धावांनी विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीच्या नावे कसोटी मालिकेत अपराजित राहण्याचा नवा विक्रम नोंदवला गेला.
 
विराटने गावसकरला मागे टाकले
-  यापूर्वी सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारत सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित (ड्रॉ सामने धरून) राहिलेला होता. 
- विराटच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा १५ वा कसाेटी विजय असून अझरुद्दीनला मागे टाकत तो तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला.
-  २०१५ मध्ये श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर रविवारचा विजय सलग सहावा मालिका विजय.
-  विराटच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सलग १९ कसोटी सामन्यांत भारत अजेय आहे.
 
१५ वा कसोटी विजय विराटच्या नेतृत्वाखाली.
०६ वा टीम इंडियाचा सलग मालिका विजय. 
बांगला देशविरुद्धच्या कसोटीत विराट ठरला प्लेअर ऑफ द मॅच.
 
विराटने लगातार 4 कसोटी शतकांचे रेकॉर्ड बनवले
- लहातरा 4 कसोटी सामन्यात 4 द्विशक करणारा विराट जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
- हे त्याच्या कसोटी करीयचीही चौथे द्विशतक आहे.
- विराटने हे द्विशतक बांगलादेश, इंग्लंड, न्युझीलंड आणि वेस्ट इंडीजच्या विरोधात झळकावले आहेत.
- याआधी डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांच्या नावावर लगातार तीन मालिकांमध्ये द्विशतकाचे रेकॉर्ड होते.
- विराटने लगातार चार द्विशतक झळकावत सर डॉन ब्रॅडमनच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा बांगलादेश विरुद्ध सामन्यात विराट कोहली आणि भारतीय खेळाडूनी कोण-कोणते रेकॉर्ड्स बनवले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...