आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या कसाेटीच्या तयारीसाठी टीम इंडिया, न्यूझीलंडचा सराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - येत्या शनिवारपासून भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेत अाहे. या कसाेटीच्या तयारीसाठी यजमान टीम इंडियाने गुरुवारी कसून सराव केला. याशिवाय पाहुण्या न्यूझीलंड संघातील खेळाडूंनीही मैदानावर सरावावर अधिक भर दिला.

दाेन्ही टीमच्या नेटवरील सरावाला पाहण्यासाठी चाहत्यांची माेठ्या संख्येत गर्दी हाेती. सकाळच्या पहिल्या सत्रात पावसाची दाट शक्यता हाेती. त्यामुळे वातावरण ढगाळ असल्याने हवेत गारवा हाेता. त्यामुळे टीम इंडियाने उशिरा हाेळकर मैदानावर सरावाला सुरुवात केली. अाता दाेन्ही संघ शुक्रवारी सकाळी ९ वाजता सरावासाठी मैदानावर हजर हाेतील. सरावासाठी पाहुण्या टीमचे खेळाडू प्रथम अाले. त्यानंतर काेहलीच्या नेतृत्वात भारताचे खेळाडू हाेळकर मैदानावर दाखल झाले. सरावादरम्यान भारतीय संघाच्या खेळाडूंनी फुटबाॅलचा अानंद लुटला.
बातम्या आणखी आहेत...