आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • India V New Zealand, 3rd Test: Spin Shy Kiwis Face Uphill Task In Indore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिसरी कसोटी ८ ऑक्टोबरपासून; दोन्ही संघ इंदूर शहरात पोहोचले !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - होळकरनगरीतील क्रिकेटप्रेमींना येत्या ८ ऑक्टोबरपासून सुरू होणारा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहता येणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-० ने पुढे आहे. चाहत्यांचा उत्साह कायम असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने चाहत्यांना केले आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव मिलिंद कनमडीकर म्हणाले, भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी येथील महाराणी उषाराजे होळकर स्टेडियमवर ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहे. सामन्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सामन्याला ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात होईल. भारत-न्यूझीलंड तिसरी कसोटी बीसीसीआयकडून होत आहे. हा सामना न होण्याबाबत बीसीसीआयने आम्हाला कसलीच सूचना दिलेली नाही. या सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंडचे संघ बुधवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. दोन्ही संघ कोलकात्याहून चार्टर विमानाने इंदुरात पोहोचले. दोन्ही संघ गुरुवार आणि शुक्रवारी सराव करतील.

लोढा समितीने बीसीसीआयच्या बँक खात्यावर निर्बंध आणल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी न्यूझीलंडविरुद्ध मालिका आर्थिक अडचणीमुळे अर्धवट राहू शकते, अशी शक्यता व्यक्त केली होती. यानंतर लोढा समिती आणि बीसीसीअायमध्ये बरेच वाक््युद्ध रंगले. यादरम्यान इंदूर येथील कसोटी होणार की नाही, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, तिसरी कसोटी इंदुरात होणार असल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे. वनडे मालिकाही ठरल्यानुसार होऊ शकेल.

इंदूरचे क्रिकेट मैदान यामुळे आहे खास
१ वीरेंद्र सेहवागने येथे २०११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे सामन्यात २१९ धावांची वैयक्तिक सर्वोच्च द्विशतकी खेळी केली होती.
२ भारताने इंग्लंडला १५ एप्रिल २००६ रोजी ७ विकेटने हरवले.
३ भारताने इंग्लंडला १७ नोव्हेंबर २००८ रोजी ५४ धावांनी हरवले.
४ भारताने द. आफ्रिकेला १४ ऑक्टोबर २०१५ रोजी २२ धावांनी नमवले.

खेळपट्टीचा रंग कसा असेल ?
इंदूरची खेळपट्टी चेंडूला चांगली उसळी देणारी आणि फलंदाजांना मदतगार अशी आतापर्यंतची आेळख आहे. मात्र, यंदाच्या रणजी सत्रासाठी इंदूरने वेगळ्या दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. या सत्रात रणजीचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत. मध्य प्रदेशला बहुतेक सामने पश्चिम विभागात खेळायचे आहेत. मध्य प्रदेश रणजी संघाचे सामने विचारात घेऊन यंदाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. यामुळे ही खेळपट्टी कशी असेल याबाबत बरेच अंदाज व्यक्त होत आहेत. येथे वेगवान गोलंदाजांसह फलंदाजांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...