आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India V New Zealand, 5th ODI, Visakhapatnam: Team India Wins The Toss And Decides To Bat First

विजयासह टीम इंडियाची दिवाळी; न्यूझीलंडला 190 धावांनी पराभूत करून मालिका जिंकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमित मिश्राने 16 व्या ओव्हरमध्ये रॉस टेलरला (19) आणि वॉटलिंगला (0) बाद केले. मिश्राने या सामन्यात पाच गडी बाद केले. - Divya Marathi
अमित मिश्राने 16 व्या ओव्हरमध्ये रॉस टेलरला (19) आणि वॉटलिंगला (0) बाद केले. मिश्राने या सामन्यात पाच गडी बाद केले.
विशाखापट्टणम- सलामीवीर रोहित शर्मा (७०), विराट कोहली (६५) यांच्या तुफानी अर्धशतकानंतर ‘मॅन ऑफ मॅच’ लेगस्पिनर अमित मिश्राच्या (१८ धावांत विकेट) घातक गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने मालिकेतील पाचव्या वनडेत न्यूझीलंडला १९० धावांनी हरवले. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली. भारताच्या या विजयाने देशभर क्रिकेटप्रेमींना दिवाळीची भेट दिली.

भारताने ५० षटकांत बाद २६९ धावा काढल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला २३.१ षटकांत ७९ धावांत गुंडाळून दिवाळीच्या एक दिवस आधी धूमधडाका केला. भारताने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत ३-० ने हरवल्यानंतर वनडे मालिकेतही ३-२ ने पराभूत केले. या पराभवामुळे न्यूझीलंडने भारतात मालिका जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. न्यूझीलंडचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले.

अमित मिश्राने षटकांत १८ धावांत गडी बाद केले. वनडेत मिश्राने दुसऱ्यांदा गडी बाद केले. न्यूझीलंडने रांचीत ज्याप्रमाणे सामना जिंकला होता ते बघून किवी खेळाडू फिरकपुढे समर्पण करतील असे कोणालाही वाटले नाही. मिश्राशिवाय भारताकडून डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने धावांत विकेट घेतल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा ऑफस्पिनर जयंत यादवने षटकांत धावांत विकेट घेतली. न्यूझीलंडची टीम बाद ६३ वरून सर्वबाद ७९ धावांत ढेर झाली. न्यूझीलंडचा हा भारताच्या भूमीवर नीचांक ठरला. कर्णधार केन विल्यम्सनने सर्वाधिक २७ धावा काढल्या. लँथमने १९, टेलरने १९ धाव काढल्या. इतरांनी गुडघे टेकले.

धोनीही लयीत
चौथ्याक्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ५९ चेंंडूंत ४१ धावांची उपयुक्त खेळी केली. केदार जाधवने अवघ्या ३७ चेंडूंत नाबाद ३९ धावा काढल्या. यात त्याने षटकार आणि चौकार मारले. अष्टपैलू अक्षर पटेलने १८ चेंडूंत २४ धावा काढताना चौकार, षटकार मारला. सलामीवीर अजिंक्य रहाणेने ३९ चेंडूंचा सामना करताना चौकारांसह २० धावा काढल्या.
शनिवारी पाच विकेट घेणाऱ्या अमित मिश्राचे अभिनंदन करताना कर्णधार धोनी, विराट कोहली आदी.

महत्त्वपूर्ण भागीदारी
रोहित-रहाणेने पहिल्या विकेटसाठी ९.२ षटकांत ४० धावा जोडल्या. रोहितने यानंतर कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२.४ षटकांत ७९ धावा जोडल्या. कोहली आणि धोनीने तिसऱ्या विकेटसाठी १५.३ षटकांत ७१ धावांची भागीदारी केली. केदार जाधव आणि अक्षर पटेलने सहाव्या विकेटसाठी ६.३ षटकांत ४६ धावा ठोकल्या. केदार आणि अक्षरची भागीदारी उपयुक्त ठरली. भारताने बाद १९० अशा मजबूत स्थितीनंतर ३० धावांत धोनी, मनीष पांडे (०) आणि कोहलीच्या विकेट गमावल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने ५२ धावांत विकेट, ईश सोढीने ६६ धावांत िवकेट, निशामने ३० धावांत विकेट, तर मिशेल सँटनरने ३६ धावांत गडी बाद केला.

आईच्या नावाची जर्सी घालून खेळाडू मैदानात
भारतीय क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी मालिकेतील अखेरच्या आणि पाचव्या वनडेत अनोखी सुरुवात केली. टीम इंडियाचे खेळाडू आपल्या आईचे नाव लिहिलेली जर्सी घालून मैदानावर उतरले. टीम इंडियाचे हे अभियान एका नव्या विचाराचे, प्रगतीचे पाऊल ठरले आहे. हे अभियान महिलांच्या सन्मानार्थ आहे. या अभियानाला समर्थन देण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपल्या आईचे नाव लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरले.

रोहित, कोहलीची अर्धशतके
रोहितशर्मा (७०) आणि विराट कोहली (६५) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने बाद २६९ धावा काढल्या. रोहितने ६५ चेंडूंचा सामना करताना षटकार आणि चौकार मारताना ७० धावा काढल्या. रोहितचे हे २९ वे अर्धशतक ठरले. कोहलीने शानदार कामगिरी करताना मालिकेत तिसऱ्यांदा ५० प्लसचा स्कोअर केला. कोहलीने ६५ धावा काढल्या.
धावफलक

भारत
रहाणे झे. लँथम गो. निशाम २० ३९ ०३
रोहित झे. निशाम गो. बोल्ट ७० ६५ ०५
कोहली झे. गुप्तिल गो. सोढी ६५ ७६ ०२
धोनी पायचीत गो. सँटनर ४१ ५९ ०४
पांडे झे. बोल्ट गो. सोढी ०० ०५ ००
केदार जाधव नाबाद ३९ ३७ ०२
अक्षर त्रि. गो. बोल्ट २४ १८ ०१
जयंत यादव नाबाद ०१ ०१ ००
अवांतर :९. एकूण:५० षटकांत बाद २६९ धावा. गडीबाद क्रम :१-४०, २-११९, ३-१९०, ४-१९५, ५-२२०, ६- २६६. गोलंदाजी: साऊथी१०-०-५६-०, बोल्ट १०-०-५२-२, निशाम ६-०-३०-१, सँटनर १०-०-३६-१, सोढी १०-०-६६-२, अँडरसन ४-०-२७-०.

न्यूझीलंड
गुप्तिलत्रि. गो. उमेश ०० ०४ ००
लँथम झे. जयंत गो. बुमराह १९ १७ ०३
विल्यम्सन झे. केदार गो. अक्षर २७ ४० ०४
टेलर झे. धोनी गो. मिश्रा १९ ३२ ०१
निशाम त्रि. गो. मिश्रा ०३ १३ ००
वॉटलिंग त्रि. गो. मिश्रा ०० ०२ ००
अँडरसन पायचीत गो. जयंत ०० ०७ ००
सँटनर त्रि. गो. अक्षर ०४ १० ००
साऊथी यष्टिचीत गो. मिश्रा ०० ०४ ००
सोढी झे. रहाणे गो. मिश्रा ०० ०५ ००
टीम बोल्ट नाबाद ०१ ०५ ००

अवांतर:६. एकूण:२३.१ षटकांत सर्वबाद ७९ धावा. गडीबाद होण्याचा क्रम :१-०, २-२८, ३-६३, ४-६६, ५-६६, ६-७४, ७-७४, ८-७४, ९-७६, १०-७९. गोलंदाजी: उमेशयादव ४-०-२८-१, जसप्रीत बुमराह ५-०-१६-१, अक्षर पटेल ४.१-०-९-२, अमित मिश्रा ६-२-१८-५, जयंत यादव ४-०-८-१.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...