इंदूर - विराट काेहली भारतीय कसाेटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात दाेन द्विशतके झळकावणारा पहिला कर्णधार ठरला अाहे. भारताच्या इतर चार दिग्गज नवाब पताैडी, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर अाणि महेंद्रसिंग धाेनीने कर्णधाराच्या भूमिकेत प्रत्येकी एक द्विशतक ठाेकले अाहे. याशिवाय विराट काेहली हा सहा वर्षांत सचिननंतर एकाच वर्षात दाेन द्विशतके ठाेकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला अाहे. सचिनने २०१० मध्ये ही कामगिरी केली हाेती. अाता काेहलीने २०१६ मध्ये या कामगिरीने विक्रमाला गवसणी घातली. विराट कोहलीच्या २११ अाणि अजिंक्य रहाणेच्या १८८ धावांच्या बळावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसाेटीचा पहिला डाव ५ बाद ५५७ धावांवर घाेषित केला. काेहली अाणि रहाणे या दोघांच्या कसाेटी कारकीर्दीतील ही सर्वाेत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर रविवारी बिनबाद २८ धावा काढल्या.
१२ वर्षांनंतर भागीदारीचा विक्रम मोडला :
- विराट व रहाणेने चाैथ्या गड्यासाठी ३६५ धावा जोडल्या. दाेघांनी या विकेटसाठी १२ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.
- सचिन-लक्ष्मणने २००४ मध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध ३५३ धावांची भागीदारी केली होती.
- अाता विराट-रहाणेची ही भागीदारी सर्वात माेठी पाचवी भागीदारी.
३ वर्षांनंतर घरच्या मैदानावर ४०० पेक्षा अधिक धावा :
- २०१३ मध्ये सचिनने निवृत्ती घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने अापल्या घरच्या मैदानावर कसाेटीत ४०० धावांचा अाकडा पार केला.
६ वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्ध ५०० पेक्षा जास्त धावसंख्या :
- भारताने कसाेटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तिसरी सर्वात माेठी धावसंख्या उभी केली.
- यापूर्वी १९९९-२००० मध्ये अहमदाबादेत ५८३/७ तर नंतर २०११-१२ मध्ये नागपुरात ५८३/७ धावसंख्या उभारली होती.
१२ वर्षांनंतर चाैथ्या व पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजाचे साेबत शतक :
- कसाेटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा भारताच्या चार अाणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाजाने एकाच डावात शतक ठाेकले.
- यापूर्वी २००३-०४ मध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत सचिनने २४१ व पाचव्या स्थानावर लक्ष्मणनने १७८ धावांची खेळी केली हाेती.
१७ वर्षांनंतर किवींविरुद्ध कर्णधाराचे द्विशतक :
- विराट काेहलीच्या २११ धावा न्यूझीलंडविरुद्ध कसाेटी क्रिकेटमध्ये काेणत्याही कर्णधाराची दुसरी सर्वात माेठी खेळी ठरली.
- यापूर्वीचा विक्रम सचिनच्या नावे अाहे. त्याने १९९९ मध्ये अहमदाबाद कसाेटीत २१७ धावा काढल्या हाेत्या.
५ वर्षांनंतर खेळपट्टीवर पळाल्याने पेनल्टी :
- भारतीय संघाला १६८ व्या षटकादरम्यान पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजा खेळपट्टीवर पळाल्याने दुसऱ्यांदा ताकीद देण्यात अाली.
- यामुळे पेनल्टीच्या रूपात न्यूझीलंडला ५ धावांचा फायदा झाला. किवींच्या खात्यावर त्या जमा करण्यात आल्या.
- यापूर्वी वेस्ट इंडीजला अाॅक्टाेबर २०११ मध्ये बांगलादेशविरुद्ध अशा प्रकारची पाच धावांची पेनल्टी मिळाली हाेती.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, किवी प्रशिक्षक म्हणाले, विराटने आम्हाला सहज चिरडले...