आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND Vs AUS: लाॅयनकडून टीम इंडियाची शिकार, अाॅस्ट्रेलियाच्या दिवसअखेर बिनबाद 40 धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - सलामीच्या विजयाने अात्मविश्वास उंचावलेल्या अाॅस्ट्रेलियाने पुन्हा एकदा यजमान टीम इंडियाची धुळधाण उडवली. नॅथन लाॅयनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या भारताला शनिवारी दुसऱ्या कसाेटीचा पहिला डाव १८९ धावांमध्ये गुंडाळावा लागला. पुणे कसाेटीच्या दाेन डावांसह अाता बंगळुरू कसाेटीच्या पहिल्याच डावात टीम इंडियाचा  खुर्दा उडाला. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने पहिल्या  डावात दिवसअखेर  १६ षटकांत बिनबाद ४० धावा काढल्या. 
 
डेव्हिड वाॅर्नर (२३) व रेनशाॅ (१५) हे दाेघेही मैदानावर खेळत अाहेत. अाॅस्ट्रेलिया टीम अद्याप १४९ धावांनी पिछाडीवर अाहे. वाॅर्नरने एका जीवनदानाचा फायदा उचलताना नाबाद २३ धावांची खेळी केली. या वेळी त्याला मॅट रेनशाॅची महत्त्वपूर्ण साथ मिळाली. त्यामुळे त्यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली.
 
लाेकेश राहुलची एकाकी झुंज: भारताचा युवा फलंदाज लाेकेश राहुलने एकाकी झंुज दिली. त्यामुळे त्याला संयमी खेळी करताना शानदार अर्धशतक ठाेकता अाले. याशिवाय त्याने टीमच्या धावसंख्येचाही अालेख उंचावला. त्याने २०५ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकारांच्या अाधारे ९० धावांची खेळी केली.   
 
अभिनव मुकुंदचा तिसरा भाेपळा :  सलामीवीर अभिवन मुकुंदला जखमी मुरली विजयच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. मात्र, त्याला या संधीचे चीज करता अाले नाही. त्याला मिशेल स्टार्कने पायचीत करून अाल्यापावली तंबूत पाठवले. मुकुंदचा हा सहाव्या कसाेटीच्या ११ व्या डावात तिसरा भाेपळा ठरला.   
 
लाेकेश राहुल-पुजाराची अर्धशतकी भागीदारी : भारताच्या सलामीवीर लाेकेश राहुलने अभिनव मुकुंद झटपट बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारासाेबत संघाचा डाव सावरला. या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे त्यांना टीमच्या धावसंख्येचा अालेख उंचावता अाला. दरम्यान, चेतेश्वर पुजाराने ६६ चेंडूंमध्ये १७ धावा काढल्या. यामध्ये एका चाैकाराचा समावेश अाहे. त्याला लाॅयनने झेलबाद केले. त्यामुळे त्याला तंबुत परतावे लागले. मात्र,त्याने लाेकेशला महत्वाची साथ दिली.

काेहली, रहाणे, नायरकडून निराशा
भारताच्या कर्णधार विराट काेहली (१२), चेतेश्वर पुजारा (१७), अजिंक्य रहाणे (१७) अाणि करुण नायर (२६) यांनी निराशा केली. त्यांना पहिल्या डावात समाधानकारक खेळी करता अाली नाही. याशिवाय अश्विन (७), यष्टिरक्षक साहा (१) अाणि जडेजा (३) स्वस्तात बाद झाले.

लाॅयनच्या फिरकीची जादू
अाॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लाॅयनने दुसऱ्या कसाेटीचा पहिला दिवस गाजवला. त्याने अापल्या फिरकीच्या तालावर टीम इंडियाला नाचवले. त्याने भारताच्या अाठ दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने २२.२ षटकांत ५० धावा देताना ८ विकेट घेतल्या. त्याने लाेकेश राहुलसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट काेहली, अश्विन, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा अाणि ईशांत शर्माला बाद करण्याची किमया साधली.

धावफलक
भारत (पहिला डाव)    धावा     चेंडू     ४    ६
राहुल झे. रेनशॉ गो. लॉयन    ९०    २०५    ०९    ०
मुकुंद पायचीत गो. स्टार्क    ००    ०८    ००    ०
पुजारा झे. हँडसकोंब गो. लॉयन    १७    ६६    ०१    ०
कोहली पायचीत गो. लॉयन    १२    १७    ०२    ०
रहाणे यष्टी. वेड गो. लॉयन     १७    ४२    ०२    ०
नायर यष्टी. गो. वेड गो. ओकिफे    २६    ३९    ०३    ०
आश्विन झे. वॉर्नर गो. लॉयन     ०७    १४    ०१    ०
साहा झे. स्मित गो. लॉयन     ०१    १४    ००    ०
जडेजा झे. स्मित गो. लॉयन     ०३    १६    ००    ०
उमेश यादव नाबाद     ००    ०६    ००    ०
इशांत झे. हँडसकोंब गो.लॉयन    ००    ०१    ००    ०
 
अवांतर : १६. एकूण : ७१.२ षटकांत सर्वबाद १८९ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-११, २-७२, ३-८८, ४-११८, ५-१५६, ६-१७४, ७-१७८, ८-१८८, ९-१८९, १०-१८९. गोलंदाजी : मिशेल स्टार्क १५-५-३९-१, जोश हेझलवूड ११-२-४२-०, स्टीव्ह ओकिफे २१-५-४०-१, मिशेल मार्श २-०-२-०, नॅथन लॉयन २२.२-४-५०-८. 
 
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव)    धावा     चेंडू     ४    ६
डेव्हिड वॉर्नर नाबाद     २३    ५१    ०१    ०
मॅट रेनशॉ नाबाद     १५    ४७    ०१    ०
 
अवांतर : २. एकूण : १६ षटकांत बिनबाद ४० धावा. गोलंदाजी : उमेश यादव ४-१-१६-०, इशांत शर्मा ५-०-८-०, रवीचंद्रन अश्विन ६-०-११-०, रवींद्र जडेजा १-०-५-०.
 
 
बातम्या आणखी आहेत...