भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान होत असलेल्या एक दिवसीय मालिकेचा पहिला सामना आज मंगळवाळी सकाळी 8.50 वाजता पर्थच्या मैदानावर सुरु झाला. या मैदानावर भारताने 8 पैकी, 6 सामन्यांत विजय मिळविला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने दोन्ही सराव सामने जिंकून सकारात्म सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन संघाच्या माजी खेळाडूंनी ही मालिका महेंद्रसिंह धोनीसाठी 'अॅसिड टेस्ट' असल्याचे म्हटले आहे.
अशी असेल ऑस्ट्रेलियाची रणनिती...
- फिरकीपटू अॅरॉन फिंच म्हणाला की, मागील काही वर्षांत पर्थच्या खेळपट्टीत कमालीचा बदल झाला आहे. आता या मैदावावर चेंडू अधिक उसळतो. आम्ही त्याचा पुरेपुर फायदा घेणार आहोत.
- रोहित, शिखर आणि विराट उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्यानंतर यंगस्टर्स. त्यामुळे आम्हाला या फलंदाजांना विशेष लक्ष करावे लागणार आहे.
-आमचा पहिल्यापासूनच भारतावर दबाव टाकायचा प्रयत्न असेल. जेनेकरून आम्हाला विजयाकडे वाटचाल करणे सोपे जाईल.
क्रमवारी लागेल पणाला
- भारताला एक दिवसीय सामन्यात दुसऱ्या स्थानावर कायम राहण्यासाठी मालिकेत किमान एक सामना जिंकणे आवष्यक आहे.
- ऑस्ट्रेलिया (127 पॉइंट्स) पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा मालिकेतील पाचही सामन्यांत पराभव झाला तरी, ते क्रमवारीत पहिल्याच स्थानावर कायम राहतील.
- 114 पॉइंट्ससह भारत दुसऱ्या स्थानावर.
- भारताचा पाचही सामन्यांत पराभव झाला तर, भारतीय संघ न्यूझिलंडसोबत (111 पॉइंट्स) चौथ्या स्थानावर घसरेल.
पदार्पन करणाऱ्या पॅरिसला मॅक्ग्राथची जर्सी
- ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथची जर्सी क्रमांक 11 वेगवान गोलंदाज जोएल पॅरिसला मिळणे निश्चीत आहे.
- 12 जानेवारीला भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पेरिस याच जर्सीवर उतरण्याची श्यक्यता आहे.
- पॅरिस सध्या 23 वर्षांचा आहे. मॅक्ग्राथनेही याच वयात एकदिवसीय पदार्पन केले होते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, भारतीय संघासाठी का आहे पर्थचे मैदान खास...
- या आहेत Positive Facts...