आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Australia, 1st Test, Day 1 At Pune Maharashtra Cricket Association Stadium LIVE Updates!

IND vs AUS: कांगारूंचा डाव २६० धावांत गुंडाळला, अश्विनने घेतली शेवटची विकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताकडून उमेश यादवने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने केवळ ३२ धावांत ४ बळी टिपले. - Divya Marathi
भारताकडून उमेश यादवने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने केवळ ३२ धावांत ४ बळी टिपले.
पुणे- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ९ बाद २५६ धावा केल्या होत्या. त्यात दुस-या दिवशी आणखी चार धावांची भर घालून त्यांचा डाव २६१ धावांत संपुष्टात आला. आर. अश्विनने मिशेल स्टार्कला ६१ धावांवर बाद करत कांगारूंचा डाव गुंडाळला. दिवसअखेर मिशेल स्टार्क ५७ आणि जेश हेजलवूड (१) मैदानात होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा पण तो त्यांच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला नाही. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मॅट रेनशॉने ६८ धावा ठोकल्या तर तळात येऊन मिशेल स्टार्कने फटकेबाजी करत अर्धशतक ठोकले. रेनशॉ, स्टार्कचे अर्धशतक....
 
- ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर वॉर्नर व रेनशॉ यांनी ८२ धावांची भागीदारी केली.
- मात्र, त्यानंतर ऑस्टेलियाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले.
- सलामीवीर डेविड वॉर्नरला ३८ धावांवर उमेश यादवने त्रिफळाचित केले. वॉर्नरने ७७ चेंडूत ६ चौकारासह ३८ धावा केल्या.
- तर, सलामीवीर मॅट रेनशॉ (३६) धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. संघाची पडझट झाल्यानंतर तो पुन्हा मैदानात परतला. अखेर तो ६८ धावांवर बाद झाला. अश्विनने त्याला झेलबाद केले. 
- त्यानंतर भरवशाचा शॉन मार्श (१६) धावांवर बाद झाला. त्याला जयंत यादवने कोहलीद्वारे झेलबाद केले.
- कर्णधार स्टीव स्मिथला २७ धावांवर अश्विनने तर पीटर हेड्सकॉम्बला जडेजाने २२ धावांवर बाद केले.
- मिशेल मॉर्शला जडेजाने अवघ्या ४ धावांवर पायचित केले.  
- मॅथ्यू वेडला उमेश यादवने ८ धावांवर पायचित केले.
- त्यानंतर उमेश यादवने ओफेक आणि नॅथन लॉयन यांना लागोपाठच्या चेंडूवर शून्यावर बाद करत कांगारूंना धक्के दिले.
- त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ९ बाद २०५ अशी दारूण अवस्था झाली.
- मात्र, त्यानंतर मिशेल स्टार्कने जेश हेजलवूडला सोबत घेत जोरदार फटकेबाजी केली.
- या जोडीने दहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
 
उमेश यादव चमकला....
 
- भारताकडून उमेश यादवने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने केवळ ३२ धावांत ४ बळी टिपले.
- अश्विनने ५८ धावांत २ बळी टिपले तर जडेजाने ७४ धावांत २ बळी घेतले.
- जयंत यादवने ५८ धावा देत १ बळी मिळवला. इशांत शर्माला एकही विकेट मिळाली नाही. 
 
सलग चौथी मालिका जिंकण्याचे विराट सेनेचे लक्ष्य-
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९४७ पासून ९० कसोटी सामने झाले असून, यात भारताने २४ विजय मिळवताना ४० मध्ये पराभव स्वीकारला. एक सामना टाय झाला तर २५ सामने ड्रॉ झाले. भारताने पुण्याची कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा हा २५ वा विजय ठरेल. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया मागच्या १९ कसोटींपासून अपराजित आहे, तर पाहुण्या ऑस्ट्रेलियाला मागच्या १२ वर्षांपासून भारतात विजयाची प्रतीक्षा आहे. भारतीय टीम आपल्या घरच्या मैदानावर सलग चौथी मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. 

सातव्या मालिका विजयाचे प्रयत्न-

कोहली ब्रिगेडने सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. भारताने कोहलीच्या नेतृत्वात श्रीलंकेला २-१ ने, द. आफ्रिकेला ३-० ने, वेस्ट इंडीजला २-० ने, न्यूझीलंडला ३-० ने, इंग्लंडला ४-० ने तर बांगलादेशला १-० ने हरवले. यात श्रीलंका आणि वेस्ट इंडीजला भारताने त्यांच्या घरात हरवले. ऑस्ट्रेलियाने मागच्या चार मालिकांपैकी दोनमध्ये विजय मिळवला.
 
सचिनचा विक्रम मोडण्याची कोहलीला संधी-

चार कसोटी मालिकांत सलग चार द्विशतके ठोकण्याचा पराक्रम कोहलीने केला आहे. कोहलीने मागच्या १२ सामन्यांत ६ शतके ठोकून १२७६ धावा काढल्या आहेत. या मालिकेत कोहलीकडे क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुणाचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी असेल. कोहलीच्या नावे सध्या ८९५ रेटिंग गुण आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावे ८९८ रेटिंग गुण होते. सचिनच्या विक्रमापासून कोहली केवळ ३ गुणांनी मागे आहे. कोहली सध्या शानदार फॉर्मात असून, तो ९०० रेटिंग गुणांचा टप्पा गाठू शकतो. असे झाले तर ९०० रेटिंग गुण मिळवणारा सुनील गावसकर (९१६)यांच्यानंतर दुसरा फलंदाज ठरेल.
 
बॉर्डर-गावसकर ६ वेळा भारताच्या नावे-

१९९६ पासून दोन्ही देशांत आतापर्यंत १२ बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका झाल्या आहेत. यात भारताने ६, तर ऑस्ट्रेलियाने ५ मालिका जिंकल्या आहेत. एक मालिका ड्रॉ झाली होती. अखेरची मालिका २०१४-१५ मध्ये आॅस्ट्रेलियात झाली. भारताने ती मालिका २-० ने गमावली होती.

कांगारूंनी ७ कसोटी मालिका गमावल्या-

अॉस्ट्रेलियाने भारतात १३ कसोटी मालिका खेळल्या असून, यामध्ये ७ मालिकांत त्यांचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतात आतापर्यंत ४६ कसोटी सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाने १९ तर ऑस्ट्रेलियाने १२ सामने जिंकले आहेत. १४ सामने ड्रॉ आणि एक सामना टाय झाला आहे.
 
अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत १० कसोटी खेळताना ५० गडी बाद केले आहेत. यात त्याने चार वेळा ५ विकेट तर एकदा १० गडी बाद केले. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अातापर्यंत केवळ ४ सामने खेळताना २४ गडी बाद केले आहेत. ऑफस्पिनर अश्विनने मागच्या १३ सामन्यांत ७८ गडी बाद केले आहेत, तर जडेजाने मागच्या १० कसोटींत ४९ विकेट घेतल्या.
२० कसोटी भारताने मागच्या चार वर्षांत भारतात खेळल्या. यात १७ विजय, ३ ड्रॉ.
१० कसोटी ऑस्ट्रेलियाने मागच्या १० वर्षांत खेळल्या. ८ पराभव, २ ड्रॉ. 
१३ बळी घेताच भारतीय भूमीवर रविचंद्रन अश्विनच्या कसोटीत २०० विकेट पूर्ण होतील.
 
पहिल्या कसोटीसाठी असे आहेत संघ-
 
भारत- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव आणि इशांत शर्मा.
 
ऑस्ट्रेलिया- डेविड वॉर्नर, मॅट रेनशॉ, स्टीव स्मिथ, शॉन मार्श, पीटर हेड्सकॉम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड, स्टीव ओकीफे, नाथन लियोन, मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवुड.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, पुणे कसोटीची क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...