पुणे- यजमान भारत व अाॅस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसाेटीचा दुसरा दिवस गाेलंदाजांनी गाजवला. शुक्रवारी गाेलंदाजांनी दबदबा कायम ठेवताना दिवसभरामध्ये १५ गडी बाद केले.
अाॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह अाेकिफेने (६/३५) अापल्या फिरकीच्या जाळ्यात अाेढून टीम इंडियाची अवघ्या १०५ धावांमध्ये दाणादाण उडवली. यजमान भारतीय संघाने ४०.१ षटकांत अापला पहिला डावात गाशा गुंडाळला. भारताने ११ धावांच्या अंतरामध्ये एकूण सात विकेट गमावल्या.
भारताला अाठ दशकांच्या इतिहासामध्ये अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. दरम्यान, भारताकडून युवा फलंदाज लाेकेश राहुलने (६४) एकाकी झुंज देताना अर्धशतक ठाेकले. इतर सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली पहिल्या डावात भाेपळा न फाेडताच तंबूत परतला.
दुसरीकडे अाॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद १४३ धावांची खेळी केली. त्यामुळे पाहुण्या अाॅस्ट्रेलियाला २९८ धावांची अाघाडी मिळाली. अाॅस्ट्रेलियाकडून कर्णधार स्मिथने (५९) शानदार नाबाद अर्धशतक ठाेकले. स्मिथ अाणि मिशेल मार्श हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत.
अाेकिफेचा षटकार
महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनच्या पुणे येथील मैदानावर अाॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू अाेकिफे चमकला. त्याने उसळत्या खेळपट्टीवर विकेटचा षटकार मारला. त्याने अापल्या करिअरमधील सर्वाेत्कृष्ट गाेलंदाजी करताना ३५ धावा देऊन ६ बळी घेतले. अाेकिफेने टीम इंडियाचा धुव्वा उडवला. त्याने टीम इंडियाच्या लाेकेश राहुलला डेव्हिड वाॅर्नरकरवी झेलबाद केले. यासह त्याने अापला पहिला बळी घेतला. त्यानंतर त्याने रहाणे (१३), वृद्धिमान साहा (०), अश्विन (१), जडेजा (२) व यादवला (४) स्वस्तात बाद केले.
- १५ विकेट दिवसभरात
- १२ बळी फिरकीपटूंचे
- ०६ बळी घेतले अाेकिफेने
- १०५ धावांमध्ये टीम इंडियाचा धुव्वा
असेही काही विक्रम
०९ वर्षांनंतर प्रथमच टीम इंडियाची घरच्या मैदानावर नीचांक धावसंख्या (१०५)
२.५ वर्षानंतर विराट काेहली प्रथमच घरच्या मैदानावर कसाेटीत शून्यावर बाद.
स्टेडियममध्ये अाग, वेळीच अपघात टळला
भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील कसाेटीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुणे येथील मैदानावर हाेणारा माेठा अपघात टळला. सामन्याच्या २२ व्या षटकादरम्यान सीमारेषेवर शाॅर्टसर्किटमुळे अाग लागली. दरम्यान, माेठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने काहीसा गाेंधळ उडाला. मात्र, स्टाफ मेंबर्सने तत्काळ अागीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला.
धावफलक
भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
विजय झे. वेड गो. हॅझलवूड १० १९ ०१ ०
राहुल झे. वॉर्नर गो. ओकिफे ६४ ९७ १० १
पुजारा झे. वेड गो. स्टार्क ०६ २३ ०१ ०
कोहली झे. हँडसकोंब गो. स्टार्क ०० ०२ ०० ०
रहाणे झे. हँडसकोंब गो. ओकिफे १३ ५५ ०१ ०
आश्विन झे. हँडसकोंब गो. लॉयन ०१ ०४ ०० ०
साहा झे. स्मित गो. ओकिफे ०० ०२ ०० ०
जडेजा झे. स्टार्क गो. ओकिफे ०२ १४ ०० ०
जयंत यष्टी वेड गो. ओकिफे ०२ १० ०० ०
उमेश झे. स्मित गो. ओकिफे ०४ ११ ०० ०
इशांत शर्मा नाबाद ०२ ०५ ०० ०
अवांतर : ०१. एकूण : ४०.१ षटकांत सर्वबाद १०५ धावा. गडी बाद क्रम : १-२६, २-४४, ३-४४, ४-९४, ५-९५, ६-९५, ७-९५, ८-९८, ९-१०१, १०-१०५. गोलंदाजी : स्टार्क ९-२-३८-२, ओकिफे १३.१-२-३५-६, हेझलवूड ७-३-११-१, लायन ११-२-२१-१.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
वॉर्नर पायचित गो. अश्विन १० ०६ ०२ ०
मार्श पायचित गो. अश्विन ०० २१ ०० ०
स्मित नाबाद ५९ ११७ ०७ ०
हँडसकोंब झे. विजय गो. अश्विन १९ ३४ ०३ ०
रेनशॉ झे. शर्मा गो. जयंत यादव ३१ ५० ०५ ०
मिशेल मार्श नाबाद २१ ४८ ०२ १
अवांतर : ०३. एकूण : ४६ षटकांत ४ बाद १४३ धावा. गडी बाद क्रम : १-१०, २-२३, ३-६१, ४-११३. गोलंदाजी : रवीचंद्रन अश्विन १६-३-६८-३, रवींद्र जडेजा १७-६-२६-०, उमेश यादव ५-०-१३-०, जयंत यादव ५-०-२७-१, इशांत शर्मा ३-०-६-०.