भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होत असलेल्या 5 एक दिवसीय मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी सकाळी 8.50 वाजता ब्रिस्बेन मैदावावर खेळला जाईल. इशांत शर्माचे तंदुरुस्त होणे भारतीय संघासाठी शूभ संकेत आहे. त्याला उमेश अथवा भुवनेश्वरच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये सामिल केले जाऊ शकते. भारताला पर्थ येथे झालेल्या एक दिवसीय सामन्यात 309 धावा करूनही पराभवाचा सामना करावा लागला होता.
विजयासाठी गोष्टी आहेत महत्वाच्या
1. रन रेट मेंटेन ठेवणे आवश्यक.
2. वेगवान गोलंदाजांना लाइन आणि लेंथ वर ठेवावे लागेल लक्ष.
3. फिरकीपटूंना रहावे लागेल प्रयोग शील.
4. सलामीवीरांना जमबसवणे आवश्यक.
5. अपयशाच्या भितीला ठेवावे लागेल दूर.
भारतासाठी या आहेत पॉझिटिव बाबी..
- पर्थ येथे डेब्यू स्टार बरिंदर सरनने चांगली गोलंदाजी केली. त्याने 3 बळी मिळवले. ब्रिस्बेनमध्येही त्याच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल.
- रोहित-विराट फॉर्ममध्ये आहेत. या दोघांचा मैदानावर जम बसल्यास ब्रिस्बेनमध्ये भारत सहजपणे मोठी धावसंख्या करू शकतो.
...तर काय एकच फिरकीपटू खेळणार ?
- पहिल्या सामन्यात आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा महागडे ठरले.
- ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्टीवर दोन फिरकीपटूंसह उतरण्याची धोनीची खेळी चुकीची ठरली.
- अशा स्थितीत धोनीला वेगवान गोलंदाजांवरच विश्वास ठेवावा लागेल.
- यानपैकी कुणी संघा बाहेर झाले तर उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि बरिंदर सरन संघात असतील.
ब्रिस्बेनमधे भारताची कामगिरी
- भारताने ब्रिस्बेनमध्ये आतापर्यंत एकूम 15 सामने खेळले आहेत, त्या पैकी 4 सामने जिंकले आहेत.
- ऑस्ट्रेलियासोबत खेळले आहेत 6 सामने. या पैकी, ऑस्ट्रेलियाने 3 आणि भारताने 2 सामने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ झाला आहे.
संघ...
भारत : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, एमएस धोनी (कर्णधार), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, गुरकीरतसिंग मान, रिषि धवन, बरिंदर सरन.
ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, स्टीवन स्मिथ (कर्णधार), शॉन मार्श, मिचेल मार्श, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, जोश हेजलवुड, स्कॉट बॉलंड, जोएल पॅरिस, जॉन हॅस्टिंग्स, डेव्हिड वॉर्नर.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, विजयासाठी कोणत्या गोष्टी आहेत आवश्यक...