Home »Sports »From The Field» India Vs Australia, 3rd Test, Day 4 At Ranchi JSCA International Stadium

IND v AUS: रांची कसोटी अनिर्णित, रवींद्र जडेजा पुन्हा चमकला, 124 धावांची भागीदारी केली मार्श-हँड्सकाेम्बने

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Mar 21, 2017, 02:12 AM IST

रांची -पीटर हँड्सकाेम्ब (नाबाद ७२) आणि शॉन मार्श (५३) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ केला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १०० षटकांत ६ बाद २०४ धावा काढल्या आणि भारताच्या विजयाचे स्वप्नभंग केला. सामन्यात २०२ धावा काढून द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा सामनावीर ठरला. मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेचा अखेरचा कसोटी सामना २५ मार्चपासून आता धर्मशाला येथे खेळवला जाईल.
भारत रांची कसोटी जिंकेल असे वाटत होते. भारताने जेवणाच्या वेळेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या ८३ धावांत ४ विकेट घेतल्या होत्या. जडेजाच्या जबरदस्त चेंडूवर स्टीव्हन स्मिथ २१ धावा काढून बाद झाला होता. जेवणाच्या ब्रेकनंतर शॉन मार्श आणि हँड्सकाेम्ब यांनी जबरदस्त झुंज दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी करून सामना ड्रॉ केला. २०१०-११ नंतर प्रथम भारतात एखाद्या पाहुण्या संघाने पहिल्या डावात मागे पडल्यानंतर सामना ड्रॉ करण्याचा पराक्रम केला.
मार्श-हँड्सकाेम्ब यांनी पाचव्या विकेटसाठी ६२.१ षटकांत १२४ धावांची भागीदारी केली. जडेजाने ९२ व्या षटकात मार्शला बाद करून ही भागीदारी मोडली. अश्विनने तीन धावांनंतर ग्लेन मॅक्सवेलला (२) धावांवर बाद केले. मॅक्सवेल बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे ९५ वे षटक सुरू होते. १०० षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कर्णधार सामना ड्रॉ करण्यासाठी तयार झाले.
- पीटर हँडसकोम्ब-शॉन मार्श यांनी पाचव्या विकेटसाठी ३७३ चेंडूंत १२४ धावांची भागीदारी केली. चेंडूच्या हिशेबाने आशियात ही दुसरी सर्वांत मोठी भागीदारी ठरली. सर्वांत मोठ्या भागीदारीचा विक्रम जस्टिन लँगर-सायमन कॅटिच (३९१ चेंडू, २००४ वि. श्रीलंका) यांच्या नावे आहे.
अश्विनने केली स्टेनची बरोबरी
- अश्विनने २०१६-१७ सत्रात १२ कसोटींत ७८ गडी बाद केले. त्याने एका सत्रात सर्वाधिक ७८ गडी बाद करण्याच्या स्टेनच्या विक्रमाची बरेाबरी केली. स्टेनने २००७-०८ मध्ये हा विक्रम केला होता.
- रवींद्र जडेजाने या सत्रात आतापर्यंत ६७ बळी घेतले आहेत. एका सत्रात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत त्याने ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडून तिसरे स्थान पटकवले. जडेजाने या मालिकेत स्टिव स्मिथला तिसऱ्यांदा बाद करण्याचा पराक्रम केला.
धोनीने रांचीत लुटला सामन्याचा आनंद
विजय हजारे ट्रॉफीनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोमवारी सामना पाहण्यासाठी पोहोचला. धोनीचा फोटो बीसीसीआयने पोस्ट केला. रांचीत जन्मलेला धोनी सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. कोच अनिल कुंबळेसह अनेकांना धोनी आपल्या राज्यातील हा सामना पाहण्यासाठी येण्याची आशा होती. अखेर सर्वांची इच्छा पूर्ण झाली.
रवींद्र जडेजाच्या सामन्यात ९ विकेट
- सामन्यात रवींद्र जडेजाने सर्वात यशस्वी गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात ५ विकेट, तर दुसऱ्या डावात ४ गडी बाद केले.
-जडेजाने आपल्या करिअरमध्ये ३० फलंदाजांना बोल्ड केले आहे. यात भारतीय डावखूऱ्या गोलंदाजांत विनू मंकड आणि बिशनसिंग बेदी अजून जडेजाच्या पुढेच आहेत.
-रवींद्र जडेजाची भारतीय जमिनीवरची सरासरी १८.८३ अशी आहे. यात तो जगात पाचव्या क्रमांकावर आहे.
-इंग्लंडविरुद्ध राजकोट येथे पहिल्या कसोटीच्या ७ सामन्यानंतर भारतात हा सामना ड्रॉ झाला.
- शॉन मार्श (53) जडेजाच्या बॉलवर मुरली विजयच्या हातात झेल देऊन बाद झाला.
- शॉन मार्शने 191 बॉलमध्ये आपले अर्धशतक पुर्ण केले.
- पीटर हँड्सकॉबने 128 बॉलचा सामना करून दमदार अर्धशतक झळकावले.
- जडेजाची तिसरी विकेट, स्टिवन स्मिथ 21 रन बनवून तंबूत परतला.
- इशांत शर्माच्या बॉलवर मॅट रेनशॉ 15 रन बनवून बाद.
असा होता चौथ्या दिवसाचा खेळ
- भारताने चौथ्या दिवशी ६ बाद ३६० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी पुजारा १३० आणि साहा १८ धावांवर होते.
- पुजाराने करिअरचे तिसरे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे द्विशतक ठोकले.
- साहाने करिअरचे तिसरे शतक काढले. साहा कसोटीत १००० हजार धावांपासून १८ धावांनी मागे आहे. - अष्टपैलू रवींद्र जडेजाने ५५ चेंडूंत ५ चौकार, १ षटकारासह नाबाद ५४ धावा काढल्या. जडेजाच्यासुद्धा कसोटीत ९८८ धावा झाल्या आहेत.
- जडेजाने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला (१४) आणि नॅथन लॉयनला (२) त्रिफाळाचीत केले.
- खेळ संपला त्यावेळी रेनशॉ ७ धावांवर नाबाद होता.

पुजाराचे द्विशतक...
- पुजाराने विकेटकीपर वृद्धिमान साहासोबत (११७) सातव्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या विकेटसाठी ही भारताकडून सर्वात मोठी भागीदारी ठरली.
- पुजाराने आपल्या खेळीत ५२५ चेंडूंचा सामना करताना २१ चौकार मारले.
- ८५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुजारा पहिला भारतीय आहे, ज्याने ५०० पेक्षा अधिक चेंडू खेळले. यादरम्यान तो ६७२ मिनिटे खेळपट्टीवर होता.

पुजारा-साहाला रिव्ह्यूचा फायदा...
पुजारा-साहा यांना रिव्ह्यूचा फायदा झाला. पॅट कमिन्सने साहाला पायचीत केले. पंचांनीही त्याला बाद दिले. साहाने रिव्ह्यू मागितले. रिव्ह्यूत साहा नाबाद ठरला. पुजाराला १५७ च्या स्कोअरवर लॉयनने पायचीत केले. त्यानेसुद्धा रिव्ह्यू मागितले. तोसुद्धा नंतर नाबाद ठरला.

५२५ चेंडू खेळून काढल्या २०२ धावा...
भारताच्या चेतेश्वर पुजाराने कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा भारतीय विक्रम केला. याआधी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावे होता. पुजाराने रांची कसोटीत ५२५ चेंडूंचा सामना करताना २१ चौकारांसह ३८.४७ च्या स्ट्राइक रेटने २०२ धावा काढल्या.
- चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन द्विशतके झळकावली. हॅमंडने सर्वाधिक ४ द्विशतके काढली. ब्रायन लाराने ३ तर ग्रॅहम पोलॉक, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी २ द्विशतके ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावली.

२००० धावांचा पुजाराचा विक्रम
एका सत्रात प्रथम श्रेणीत २००० पेक्षा अधिक धावा काढणारा पुजारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. एका सत्रात सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रमात त्याने २०१६-१७ सत्रात कोहलीला मागे टाकले. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ कसोटी सामन्यांत १००० धावांचा टप्पा गाठला.

धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव ४५१ धावा.

भारत पहिला डाव...
(कालच्या ६ बाद ३६० धावांवरुन पुढे)
पुजारा झे. मॅक्सवेल गो. लॉयन २०२ ५२५ २१ ०
साहा झे. मॅक्सवेल गो. ओकिफे ११७ २३३ ०८ १
रवींद्र जडेजा नाबाद ५४ ५५ ०५ १
उमेश झे. वॉर्नर गो. ओकिफे १६ ३३ ०२ ०
इशांत शर्मा नाबाद ०० ०४ ०० ०

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव
वॉर्नर त्रि.गो. जडेजा १४ १६ ०३ ०
रेनशॉ नाबाद ०७ २१ ०१ ०
लॉयन त्रि. गो.जडेजा ०२ ०७ ०० ०
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended