आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia, 4th ODI As It Happened: India Snatch Defeat From Jaws Of Victory

टीम इंडियाच्या चौथ्या परभवावर भडकले दिग्गज, गावसकर म्हणाले - काहींना काढणे गरजेचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलग चौथ्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाराज झाले आहेत. माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी टीमवरील राग व्यक्त करताना म्हटले, की काहींना संघातून काढणे गरजेचे झाले आहे. बुधवारी कॅनबरे येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 25 रन्सनी पराभव केला. मालिकेचा शेवटचा समाना शनिवारी सिडनीत खेळला जाणार आहे.

काय म्हणाले गावसकर
- काही खेळाडूंचा हा तिसरा किंवा चौथा ऑस्ट्रेलिया दौरा होता. मात्र ते मागील वेळी केलेल्या चुकांमधून काहीही शिकलेले दिसत नाहीत.
- त्याच चुका त्यांनी परत केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर भारतीय निवड समितीला काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.
- 2019 चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून काही तरुण खेळाडूंना संधी देण्याची गरज आहे. सर्व खेळाडूंना खाली बसवा असे मी म्हणत नाही, मात्र काहींना बाहेर काढण्याची नक्कीच वेळ आलेली आहे.
- अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी न करणे हा निक्कीच चुकीचा निर्णय होता.

भारतीय डावात काय खास
- रोहित शर्माने 25 बॉलमध्ये 41 रन्स केले.
- शिखर धवनने 113 बॉलमध्ये 14 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 126 रन्स केले.
- विराटने 92 बॉलमध्ये 106 रन्स केले.
- ऑस्ट्रेलियासाठी केन रिचर्डसनने 68 रन्स देत 5 विकेट मिळवल्या. तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

अखेरच्या 13 ओव्हरमध्ये सामना बदलला
- 37.2 ओव्हरमध्ये भारत 277/1 वर खेळत होता. 9 विकेट भारताने अवघ्या 46 रन्सवर गमावल्या .
- धोनी - 0 , गुरकिरत 5, राहाणे 2, ऋषि 9 असे स्वस्तात बाद झाले.
गुरकिरत आणि ऋषिचा अनुभवाचा आभाव
- अटीतटीच्या सामन्यात गुरकिरत (5) टॉप ऑर्डरवर खेळण्यास आला, मात्र तळातील फलंदाजा सारखी त्याची खेळी राहिली.
- ऋषि धवन (9) नेही तेच केले. दोघांची भूमिका संघात नसल्यात जमा होती.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाला गांगुली