आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनीत आजा 5 वा वनडे: क्रमवारीतील स्थान कायम ठेवण्यावर टीम इंडियाची नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या टीम इंडियाची नजर आता आयसीसीच्या क्रमवारीतील आपले दुसरे स्थान कायम ठेवण्यावर लागली आहे. सलगच्या चार पराभवांमुळे भारताचे क्रमवारीतील स्थान धोक्‍यात आले आहे. त्यामुळे पाचव्या आणि शेवटच्या वनडेत यजमान ऑस्‍ट्रेलियावर मात करून आपले दुसरे स्थान कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. हे
स्थान वाचवण्यासाठी भारतीय संघाला एका विजयाची आवश्‍यकता आहे.
वनडे मालिकेतील पाचवा वनडे शनिवारी होणार आहे. आतापर्यंत सलग चार विजयांसह ऑस्‍ट्रेलियाने मालिकेत आपला दबदबा निर्माण केला आहे. आता पाचव्या वनडेतही बाजी मारून टीम इंडियाचा सुपडासाफ करण्याचा यजमान टीमचा प्रयत्न असेल. त्यासाठी यजमानांनी कंबर कसली आहे. सध्या भारतीय संघाचा विराट कोहली (२ शतके), शिखर धवन (१ शतक) आणि रोहित शर्मा (२ शतके) फार्मात आहेत. मात्र, तळातल्या फलंदाजांना अद्याप सूर गवसलेला नाही. तसेच युवा खेळाडू गुरकिरत मान आणि ऋषी धवन हे फारशी छाप पाडू शकले नाहीत. तसेच टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी सपशेल निराशा केली आहे. त्यांना समाधानकारक खेळी करता आली नाही. ईशांत शर्मासारख्या अनुभवी गोलंदाजानेही सर्वांची निराशा केली.

अश्विन, अक्षर पटेलला संधी?: सिडनीच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना आपले डावपेच यशस्वी करण्याची संधी आहे. त्यामुळेच अश्विनला पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. ऋषी धवनला डच्चू देत अक्षर पटेलच्या निवडची शक्यता आहे. कदाचित हे दोन बदल टीमचा पराभव टाळू शकेल.
संभाव्य संघ असे
भारत :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अश्विन, उमेश पटेल, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, बरिंदर शरण, गुरकिरतसिंग मान.
ऑस्‍ट्रेलिया: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जॉर्ज बेली, डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, जेम्स फॉकनर, जॉन हेस्टिंग्स, केन रिचर्डसन, नॅथन लॉयन.
पावसाचे सावट
मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या वनडेवर पावसाचे दाट सावट असल्याचा अंदाज पिच क्युरेटर यांनी वर्तवला अाहे. त्यामुळे या सामन्यांच्या षटकांची संख्या कमी हाेण्याची शक्यता आहे.