Home »Sports »From The Field» India Vs Australia Fifth And Last ODI At Nagpur

टीम इंडिया पुन्हा नंबर वन; राेहित शर्माचे शानदार शतक; सात विकेट्सनी जिंकला सामना

सलामीवीर राेहित शर्माच्या (१२५) झंझावाती फलंंदाजीच्या बळावर भारतीय संघाने रविवारी मालिकेतील शेवटच्या अाणि पाचव्या वनडेत

वृत्तसंस्था | Oct 02, 2017, 07:27 AM IST

नागपूर-सलामीवीर राेहित शर्माच्या (१२५) झंझावाती फलंंदाजीच्या बळावर भारतीय संघाने रविवारी मालिकेतील शेवटच्या अाणि पाचव्या वनडेत अाॅस्ट्रेलियाचा पराभव केला. यजमान भारताने अापल्या घरच्या मैदानावर ७ गड्यांनी सामना जिंकला. या विजयाच्या बळावर भारताने पुन्हा एकदा वनडे क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन काबिज केले. यामुळे अाफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली.

या विजयामध्ये अजिंक्य रहाणेने (६१) अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिले. राेहित अाणि रहाणेच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने अापला विजय निश्चित केला. राेहित शर्मा सामनावीर अाणि हार्दिक पांड्या मालिकावीरचा मानकरी ठरला.

मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाने अापल्या घरच्या मैदानावर पाहुण्या अाॅस्ट्रेलियन संघाचा माेठ्या खेळीचा प्रयत्न हाणून पाडला. युवा गाेलंदाज अक्षर पटेल (३/३८) अाणि जसप्रीत बुमराहने (२/५१) कांगारूंना वेळीच वेसण घातली. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाला मालिकेतील पाचव्या अाणि शेवटच्या वनडेत ९ गड्यांच्या माेबदल्यात २४२ धावांची खेळी केल. प्रत्युत्तरात भारताने ४२.५ षटकांत ३ गडी गमावून विजयश्री खेचून अाणली.

अाॅस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने (५३) एकमेव अर्धशतकी खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांना समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाचा माेठ्या धावसंख्येचा प्रयत्न अपयशी ठरला. सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर अाणि अॅराेन फिंचने हा निर्णय याेग्य ठरवला. त्यांनी तुफानी खेळी करताना संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. या दाेघांनी सामन्यात पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. दरम्यान, हार्दिक पांड्याने फिंचला बुमराहकरवी झेलबाद केले. फिंचने ३६ चेंडूंत ६ चाैकारांसह ३२ धावांची खेळी केली.
अक्षर पटेलचे तीन बळी
भारताचा युवा गाेलंदाज अक्षर पटेल सामन्यात चमकला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. त्याने १० षटकांमध्ये ३८ धावा देत हे यश संपादन केले. त्याने डेव्हिड वाॅर्नर (५३), हँडकाेम्ब (१३) अाणि हेडला (४२) बाद केले. त्यापाठाेपाठ जसप्रीत बुमराहने १० षटकांत ५१ धावा देत २ बळी घेतले. तसेच भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या अाणि केदार जाधवने प्रत्येकी एक विकेट घेतली.
२ वर्ष; ६ मालिका विजय
- भारताने २१ महिन्यात सहा मालिका विजय मिळवले.
- अाफ्रिकेवर कुरघाेडी करून टीम इंडिया १२० गुणांसह नंबर वन
- राेहितच्या वनडेत ६ हजार धावा पुर्ण; भारताचा सहावा फलंदाज
- ३३ वर्षांनंतर भारताचे प्रथमच मालिकेत कांगारूंवर चार विजय
- भारताने यंदा प्रथमच सलामीला अाठ शतकी भागीदाऱ्या केल्या.
पुढील स्लाइडवर पाहा समान्यातील क्षणचित्रे...

Next Article

Recommended