आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज टी-20 ची झुंज, युवराजसिंग, शेन वॉटसन जोशात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वनडेत विजयाने उत्साहित भारतीय संघ नव्या ऊर्जेसह टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला आव्हान देण्यास तयार आहे. दोन्ही देशांत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत मंगळवारी अॅडिलेडच्या मैदानावर खेळवली जाईल. दोन्ही देशांतील दुसरा टी-२० सामना २९ जानेवारी रोजी मंगळवारी मेलबर्नला, तर तिसरा टी-२० सामना ३१ जानेवारी सिडनीत होईल.

क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात टीम इंडिया यजमान ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत मजबूत दिसत आहे. भारतीय संघात आता युवराजसिंग, आशिष नेहरा, सुरेश रैना आणि हरभजनसारखे अनुभवी खेळाडू सामील झाले आहेत. युवा खेळाडू हार्दिक पंड्यासुद्धा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याचा दावेदार आहे. युवराजचे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत संमिश्र प्रदर्शन ठरले. त्याने विजय हजारे ट्रॉफीत ६९.२० च्या सरासरीने ३४६ धावा ठोकल्या. मात्र, मुश्ताक अली ट्रॉफीत तो अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज आशिष नेहरा २०११ च्या वर्ल्डकपनंतर आणि युवराज २०१४ च्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतील.

गोलंदाजी चिंतेचा विषय
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर धोनीसाठी टीम इंडियाची गोलंदाजी चिंतेचा विषय ठरली आहे. वेगवान गोलंदाजीचे निश्चित आक्रमण नसल्याने त्याने निराशा व्यक्त केली. सध्या अॅडिलेडला फिरकीपटूंत आर. अश्विन, हरभजन, जडेजा तर वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ऋषी धवन, उमेश यादव, हार्दिक पंड्या यांना संधी मिळू शकते. हार्दिकने मुश्ताक अली ट्रॉफीत बडोद्यासाठी १० सामन्यांत १० विकेट घेतल्या.

कांगारू जबरदस्त लयीत :
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, अनुभवी गोलंदाज जेम्स फॉकनर, स्टिवन स्मिथ जबरदस्त फॉर्मात आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काय म्हणतात टीम डायरेक्टररवी शास्त्री.
-काय म्हणाला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच...
-कसे असतील संघ