Home | Sports | From The Field | India Vs Australia Match Preview For 3rd ODI At Holkar Stadium Indore

टीम इंडियाचा अाज मालिका विजयाचा दांडिया; 5 वनडे जिंकण्याच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Update - Sep 24, 2017, 10:22 AM IST

फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता रविवारी विक्रमासह मालिका विजयाचा दांडिया खेळण्यासाठी उत्सुक अाहे. याशिवाय भारताची नजर

 • India Vs Australia Match Preview For 3rd ODI At Holkar Stadium Indore
  इंदूर- फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता रविवारी विक्रमासह मालिका विजयाचा दांडिया खेळण्यासाठी उत्सुक अाहे. याशिवाय भारताची नजर पाहुण्या अाॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्रिक नाेंदवण्याकडे लागली. भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात मालिकेतील तिसरा वनडे इंदूरच्या हाेळकर मैदानावर हाेणार अाहे.
  यादवनंतर अाता भारताला विजयाच्या हॅट्रिकची संधी
  विक्रम १ : भारताने अातापर्यंत काेणत्याही स्टेडियमवरील पहिले पाच सामने जिंकले नाहीत.
  शारजाह, मीरपूर, दिल्ली व विशाखापट्टणम स्टेडियमवर अातापर्यंत पहिल्या चार सामन्यांत विजयश्री मिळवली. हाेळकर मैदानावर विजय संपादन करून भारताला पहिला पाच सामना विजयाचा विक्रम हाेईल.

  विक्रम २ : अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत भारताने कधीही सलग चार सामने जिंकले नाहीत.
  भारताचा वनडेत अाॅस्ट्रेलियाविरुद्ध विनिंग स्ट्राइक तीन सामन्यांचा अाहे. अाता भारताने सलग तीन वनडेत अाॅस्ट्रेलियाचा पराभव केला. अाता विजयाने भारताचा चार वनडेत अाॅस्ट्रेलियाला नमवण्याचा विक्रम ठरेल.

  विक्रम ३ : अाॅस्ट्रेलियाविरुद्ध काेणत्याही मालिकेत भारताने सलग तीन सामने जिंकले नाही.
  अाता इंदूरमधील तिसरा सामना जिंकून भारतीय संघ अाॅस्ट्रेलियाविरुद्ध काेणत्याही मालिकेत सलग तीन विजय संपादन करण्याचा विक्रम करू शकताे. ३७ वर्षांनंतर हा विक्रम भारताच्या नावे हाेईल.
  संभाव्य संघ
  भारत : विराट काेहली (कर्णधार), राेहित, रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धाेनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शमी, रवींद्र जडेजा, लाेकेश राहुल.
  अाॅस्ट्रेलिया : स्मिथ (कर्णधार),वाॅर्नर, कार्टराइट, ट्रेव्हिस हेड, मॅक्सवेल, स्टाेईनिस, वेड, अॅस्ट्राेन एगर, काने रिचर्डसन, पॅट कमिन्स, नॅथन नाइल-कुल्टर, अॅराेन फिंच, पीटर हॅण्डसकाेम्ब, जेम्स फाॅकनर, अॅडम झम्पा.

Trending