आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज, आज दुसरा टी-20 सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- सलामीच्या विजयाने अात्मविश्वास बुलंदीवर असलेली टीम इंडिया मालिका अापल्या नावे करण्यासाठी सज्ज झाली. भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी मालिकेतील दुसरा टी-20 सामना रंगणार अाहे. भारताने सलामीचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने अाघाडी घेतली अाहे. अाता दुसऱ्या सामन्यातही बाजी मारून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. त्यानंतर मालिकेतील तिसरा अाणि शेवटचा सामना 31 जानेवारी राेजी सिडनीत हाेणार अाहे.
टीममध्ये अाशिष नेहरा, सुरेश रैना अाणि युवराज सिंगसह युवा खेळाडू जसप्रीत बुमराहला नेटवर सरावाची एकच संधी मिळाली. मात्र, त्यांनी सरस खेळी करून दाखवली. युवीलाही फारशी संधी मिळाली नाही, तरीही त्यांनी चांगली कामगिरी करून टीमच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, यांच्याकडून असेल अपेक्षा...