आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Bangladesh, 1st Test, Day 3: As It Happened

दोन दिवसांचा खेळ शिल्लक, विजयासाठी काय करणार टीम इंडिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरली विजय - Divya Marathi
मुरली विजय
फातुल्ला - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या शिखर धवन (१७३) अाणि मुरली विजय (१५०) यांनी अजिंक्यसाठी बांगलादेशविरुद्ध कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी धावांचा पाऊस पाडला. या दाेघांच्या २८३ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने शुक्रवारी पहिल्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४६२ धावा काढल्या. यामध्ये अजिंक्य रहाणेने ९८ धावांचे खास याेगदान दिले. त्यामुळे टीम इंडियाला मजबूत धावसंख्या उभी करता अाली. मात्र, पुन्हा एकदा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. तसेच पाऊस अाणि साकिब अल हसनने घेतलेल्या चार बळींमुळे कसाेटीवर ड्राॅचे सावट निर्माण झाले अाहे. गुरुवारी पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ हाेऊ शकला नाही.

कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी भारताने बिनबाद २३९ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर धवन अाणि विजयने संयमी खेळी करत टीमच्या धावसंख्येला गती दिली. या दाेघांनी टीमला २८३ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. द्विशतकाकडे वाटचाल करत असलेल्या धवनला साकीबने बाद केले. त्याने धवनला झेलबाद करून यजमान टीमला पहिला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्यानंतर झटपट दाेन गडी बाद झाले. राेहित शर्मा (६) अाणि कर्णधार विराट काेहली (१४) फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवू शकले नाहीत.

मुरली-अजिंक्यची शतकी भागीदारी
झटपटदाेन विकेट पडल्यानंतर मुरली विजयने अजिंक्य रहाणेसाेबत संघाचा डाव सावरला. त्याला रहाणेची महत्त्वाची साथ मिळाली. या दाेघांनी शतकी भागीदारी करून यजमान बांगलादेशचे कमबॅकचे प्रयत्न हाणून पाडले. भारताचा मुरली विजय, अजिंक्य रहाणे अाणि यजमान टीमच्या साकिबने तिसरा दिवस गाजवला. विजयने बांगलादेशविरुद्ध पहिले अाणि कसाेटी करिअरमधील सहावे शतक अापल्या नावे केले. तसेच रहाणने ९८ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने मुरली विजयसाेबत ११४ धावांची भागीदारी केली. साकिबने चार बळी घेतले.
अजिंक्य रहाणेचे शतक हुकले
भारताचाअजिंक्य रहाणेला ९८ धावांवर बाद व्हावे लागले. दुर्दैवाने अवघ्या दाेन धावांनी त्याचे शतक हुकले. साकीबने रहाणेला त्रिफळाचीत केले. त्याने १०३ चेंडूंचा सामना करताना १४ चाैकारांच्या अाधारे ९८ धावा काढल्या. याशिवाय त्याने मुरली विजयला महत्वाची साथ दिली. त्यामुळे भारतीय संघाला माेठी धावसंख्या उभी करण्यात माेलाचे याेगदान मिळाले.
धावफलक
भारत पहिला डाव धावा चेंडू
विजय पायचीत गो. साकिब अल हसन १५० २७२ १ २
धवन झे. गो. साकिब अल हसन १७३ १९५ २३
राेहित शर्मा त्रि. गो. साकिब अल हसन ०६ ०९
कोहली त्रि.गो. जुबेर हुसेनी १४ २२
रहाणे त्रि. गो. साकिब अल हसन ९८ १०३ १४
साहा त्रि. गो. जुबरे हुसेनी ०६ १०
आर. अश्विन नाबाद ०२ ०३
हरभजनसिंग नाबाद ०७ ०८

अवांतर: ०६.एकूण: १०३.३षटकांत बाद ४६२ धावा. गडीबाद होण्याचा क्रम : १-२८३,२-२९१, ३-३१०, ४-४२४, ५-४४५, ६-४५३. गोलंदाजी: मो.शाहिद २२-२-८८-०, सौम्या सरकार ३-०-११-०, शुआगाता होम १४-०-५२-०, साकिब अल हसन २४.३-१-१०५-४, तैजुल इस्लाम २०-०-८५-०, जुबेर हुसेनी १९-१-११३-२, इमरूल कायस १-०-३-०.