आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Bangladesh: Unequal Contest Finishes In A Draw

कसोटी ड्रॉ; भारतीय फिरकीपटू चमकले, अश्विनच्या ५ तर हरभजनच्या ३ विकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फातुल्ला- पावसाच्या सावटाखाली खेळवण्यात आलेली भारत-बांगलादेश एकमेव कसोटी ड्रॉ झाली. खेळाडूंपेक्षा हा सामना पावसाने अधिक गाजवला. पाच दिवसांत मैदानावर जो काही खेळ झाला त्यात भारतीयांनी बाजी मारली. सुरुवातीला धवन, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीने, तर नंतर आर. अश्विन आणि हरभजनच्या फिरकीने कसोटी गाजली. टीम इंडियाच्या ४६२ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव २५६ धावांत आटोपला. यात भारतीय फिरकीपटू अश्विन आणि हरभजनसिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

फॉलोऑनची नामुष्की आल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने दिवसाचा खेळ संपेपर्यंत १५ षटकांत बिनबाद २३ धावा काढल्या. तामिम इक्बाल (१६) आण इमारुल कायेस (७) नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. सामना ड्रॉ होताच कसोटी क्रमवारीत भारताची घसरण झाली.
बांगलादेशवर फॉलोऑनची नामुष्की : पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला त्या वेळी निकालाची आशा कमीच होती. भारतीय गोलंदाजांनी निराश न होता रविवारी दमदार कामगिरी केली. ३ बाद १११ अशा सुस्थितीत असलेल्या बांगलादेशला गोलंदाजांनी २५६ धावांत गुंडाळले. ऑफस्पिनर आर. अश्विन (८७ धावांत ५ विकेट) आणि हरभजनसिंग (६४ धावांत ३ विकेट) तळपले. अश्विनने कसोटीत दहाव्यांदा ५ गडी बाद केले. भारताने बांगलादेशला फॉलोऑन दिला. यजमान संघाने दुसऱ्या डावात १५ षटकांत बिनबाद २३ धावा काढून सामना ड्रॉ केला. पहिल्या डावात १७३ धावांची खेळी करणारा सलामीवीर शिखर धवन "मॅन ऑफ द मॅच' ठरला. बांगलादेशने भारताशी दुसऱ्यांदा सामना ड्रॉ केला.

अखेरच्या दिवशी ४९.५ षटकांचा खेळ : हा सामना पावसाने गाजवला. संपूर्ण सामन्यांत अवघ्या १७९.२ षटकांचा खेळ झाला. जवळपास २७० षटके पावसामुळे होऊ शकले नाही. कसोटीत पाच दिवसांच्या खेळात जवळपास ४५० षटकांचा खेळ होणे अपेक्षित असते. सामन्याच्या अखेरच्या दिवशी ४९.५ षटकांचा खेळ झाला. यात बांगलादेशने १६८ धावा काढल्या तर भारताने ७ विकेट घेतल्या.

धावफलक
भारत पहिला डाव ६ बाद ४६२ धावा. (डाव घोषित)
बांगलादेश पहिला डाव धावा चेंडू ४ ६
तमीम यष्टिचीत गो. अश्विन १९ २१ ३ ०
इमारूल यष्टिचीत गो. हरभजन ७२ १३९ १२ ०
मोमीनूल झे. उमेश गो. हरभजन ३० ५४ ४ ०
मुशाफिकूर झे. रोहित गो. अिश्वन ०२ ०५ ० ०
सकिब झे. साहा गो. अश्विन ०९ १५ २ ०
सौम्य सरकार त्रि. गो. अॅरोन ३७ ५४ ७ ०
लिंटन झे. रोहित गो. अश्विन ४४ ४५ ८ १
शुवागता झे. रोहित गो. अश्विन ०९ २५ १ ०
तैजूल इस्लाम नाबाद १६ ३१ ३ ०
शहिद झे. धवन गो. हरभजन ०६ ०९ १ ०
जुबेर हुसेन धावबाद ०० ०० ० ०
अवांतर : १२. एकूण : ६५.५ षटकांत सर्वबाद २५६ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२७, २-१०८, ३-११०, ४-१२१, ५-१७२, ६-१७६, ७-२१९, ८-२३२, ९-२४६, १०-२५६. गोलंदाजी : ईशांत शर्मा ७-०-२४-०, आर. अश्विन २५-६-८७-५, उमेश यादव ७-०-४५-०, वरुण अॅरोन ९-०-२७-१, हरभजनसिंग १७.५-२-६४-३.
बांगलादेश दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
तमीम इक्बाल नाबाद १६ ४१ ३ ०
इमारूल कायेस नाबाद ०७ ४९ १ ०
एकूण : १५ षटकांत बिनबाद २३ धावा. गोलंदाजी : उमेश यादव २-१-४-०, आर. अश्विन ६-२-८-०, हरभजनसिंग ५-२-११-०, मुरली विजय १-१-०-०, धवन १-१-०-०.
सामनावीर : शिखर धवन.