आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय-पुजाराची भागीदारी; भारताची मजबूत सुरुवात! फिरकीपटूंनी घेतल्या ११ विकेट, फलंदाजांच्या ५४६ धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चौथ्या कसोटीत फलंदाजांची जोरदार कामगिरी सुरू आहे. दोन दिवसांत ५४६ धावा निघाल्या. इंग्लंडने पहिल्या डावात ४०० धावा काढल्यानंतर भारताने १ बाद १४६ धावा काढत मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केली आहे. भारताकडून अश्विन (६/११) आणि जडेजाने (४/१०९) चांगली गोलंदाजी केली तरीही इंग्लंडने ४०० धावांचा टप्पा गाठला. दोन दिवसांत एकूण ११ विकेट पडल्या. खेळपट्टीवर चेंडू ज्या प्रकारे वळत आहे ते बघता येथे चौथ्या डावात फलंदाजी करणाऱ्या टीमला अडचण येऊ शकते.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताकडून मुरली िवजय आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची अभेद्य शतकी भागीदारी केली. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुल २४ धावा काढून बाद झाला. भारताच्या ३९ धावा झाल्या असताना मोईन अलीने त्याला त्रिफळाचीत केले. त्याआधी इंग्लंडने सकाळी ५ बाद २८८ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ११२ धावा जोडल्या. सकाळी ९ धावांची भर पडल्यानंतर बेन स्टोक्सला (३१) अश्विनने कोहलीकरवी झेलबाद केले. अश्विनची ही पाचवी विकेट ठरली. क्रिस वोग्सही (११) अधिक वेळ टिकू शकला नाही. जडेजाच्या गोलंदाजीवर पार्थिवने त्याचा झेल घेतला. वोक्स बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या ३२० धावा झाल्या होत्या. जडेजाने यानंतर ३३४ च्या स्कोअरवर आदिल रशीदला (४) त्रिफळाचीत केले.

बटलरचे अर्धशतक
जेवणाच्या ब्रेकच्या आधी बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने जेक बॉलसोबत (३१) इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी नवव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. जेवणाच्या ब्रेकनंतर अश्विनने बॉलला ३८८ च्या स्कोअरवर बाद केले. बटलरने ७६ धावा काढल्या. त्याने १३७ चेंडूंत १ षटकार, ६ चौकारांसह ही खेळ केली. इंग्लंडच्या ४०० धावा झाल्या असताना बटलर शेवटच्या विकेटच्या रूपात बाद झाला.

राफेल पंचगिरी करू शकणार नाहीत
डोक्यावर चेंडू लागल्यामुळे जखमी झालेले पंच पॉल राफेल स्वस्थ आहेत. मात्र, काळजी म्हणून भारत-इंग्लंडदरम्यानच्या चौथ्या कसोटीच्या उर्वरित दिवशी ते पंचगिरी करणार नाहीत. डॉक्टरांनी राफेल यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे शुक्रवारी आयसीसीने सांगितले. भुवनेश्वरकुमारच्या एका थ्रोवर राफेल जखमी झाले होते.

पुढे वाचा...
- भारताची सामन्यावर पकड : पार्थिव पटेल
- अश्विनने २३ व्या वेळी कसोटीत ५ गडी बाद करून कपिल देवची बरोबरी केली
बातम्या आणखी आहेत...