आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माेहालीत अाजपासून यजमान भारताचे इंग्लंडसमाेर अाव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - गत सामन्यातील विजयाने अात्मविश्वास बुलंदीवर असलेला भारतीय संघ अाता माेहालीच्या मैदानावर पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात पाहुण्या इंग्लंडला अडकवण्यासाठी उत्सुक अाहे. माेहालीच्या अायएस बिंद्रा स्टेडियमवर शनिवारपासून यजमान भारत अाणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेईल. भारताने दुसऱ्या कसाेटीत शानदार विजयासह मालिकेत १-० ने अाघाडी घेतली अाहे. विराट काेहलीच्या नेतृत्वात अाता तिसरी कसाेटी जिंकून अापली अाघाडीची लय कायम ठेवण्याचा यजमान भारताचा प्रयत्न असेल. याशिवाय अाठ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या पार्थिव पटेलकडूनही टीम इंडियाला माेठ्या खेळीची अाशा अाहे. या वेळी त्याच्यावरही सर्वांची नजर असेल. इंग्लंडकडून पलटवाराची अाशा

पाहुणा इंग्लंडचा संघ १९८४-८५ अाणि २००२ मधील अापल्या शानदार एेतिहासिक कामगिरीला उजाळा देऊ शकताे. यादरम्यान पिछाडीनंतरही दमदार कमबॅक करताना इंग्लंडने यजमान भारतावर पलटवार केला हाेता. त्यामुळे भारतावर दाेन्ही वेळा मालिका गमावण्याची नामुष्की अाेढवली हाेती. त्यामुळे अाता अशा प्रकारच्या कामगिरीची इंग्लंड संघाकडून अाशा केली जात अाहे. मात्र, यासाठी इंग्लंडच्या टीमला माेठी कसरत करावी लागेल. कारण टीम इंडियाचे खेळाडू जबरदस्त फाॅर्मात अाहेत.
संभाव्य संघ
भारत : विराट काेहली (कर्णधार), मुरली विजय, लाेकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, माे. शमी, हार्दिक पंड्या, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर.
इंग्लंड : अॅलेस्टर कुक (कर्णधार), हसीब हमीद, ज्याे रुट, बेन डकेट, माेईन अली, बेन स्टाेक्स, जाेस बटलर, जाॅनी बेयरस्ट्राे, क्रिस वाेक्स, अादिल रशीद, स्टुअर्ट ब्राॅड, गॅरेथ बैटी, फीन, जिमी अँडरसन.

पुढे वाचा... भारताची मजबूत बाजू
बातम्या आणखी आहेत...