आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-न्यूझीलंड तिसरी कसाेटी आजपासून रंगणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला शनिवारपासून इंदूरच्या हाेळकर स्टेडियमवर सुरुवात हाेत अाहे. सलगच्या दाेन विजयाच्या बळावर भारताने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेतली अाहे. अाता विजयी हॅट््ट्रिकसाठी यजमान टीम इंडिया सज्ज झाली अाहे. तसेच पाहुण्या न्यूझीलंडचा सफाया करण्यासाठी यजमान टीम उत्सुक अाहे. यासह भारतीय संघ चार वर्षांत तिसऱ्यांदा अापल्या घरच्या मैदानावर पाहुण्या टीमला क्लीन स्विप देण्याचा पराक्रम गाजवणार अाहे. यापूर्वी भारताने अाॅस्ट्रेलियाचा ४-० ने (२०१२-१३), वेस्ट इंडीजचा २-० ने (२०१४) मालिकेत पराभव केला हाेता. याशिवाय टीम इंडियाने अाफ्रिकेविरुद्धच्या चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजय संपादन केला हाेता. अाता भारतीय संघाला ही संधी अाहे. शेवट गाेड करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल.

विलियम्सनवर मदार
न्यूझीलंड टीमच्या विजयाची मदार ही कर्णधार केन विलियम्सनवर असेल. त्याने कानपूर कसाेटीत भारताच्या अार.अश्विन अाणि रवींद्र जडेजाच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला हाेता. यादरम्यान त्याने अर्धशतक अाणि २५ धावांची खेळी केली हाेती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये न्यूझीलंड टीमचा काेलकाता कसाेटीत धुव्वा उडाला.

किवी गाेलंदाजांवर नजर : न्यूझीलंडच्या टीमला अापल्या वेगवान गाेलंदाजांवर विश्वास अाहे. याचे नेतृत्व ट्रेंट बाेल्ट अाणि मॅट हेनरी करणार अाहेत. हेनरीने काेलकात्यातील दुसऱ्या कसाेटीत चांगली गाेलंदाजी केली. याशिवाय इश साेढी, सॅटनरही इंदूरच्या खेळपट्टीवर अाता समाधानकारक कामगिरी करू शकतात.

ढगाळ वातावरणाने पावसाचे सावट
इंदूरच्या कसाेटीदरम्यान पावसाच्या व्यत्ययाची शक्यता अाहे. मात्र, पावसाचा अंदाज अद्याप हवामान खात्याने वर्तवला नाही. मागील दाेन दिवसांपासून या ठिकाणी हलक्या सरी पडत अाहेत. मात्र, काेणताही व्यत्यय येणार नसल्याचा विश्वास राज्य संघटनेने व्यक्त केला.

गाैतम गंभीर खेळणार?
तिसऱ्या कसाेटीत गाैतम गंभीर खेळणार असल्याचे टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने सांगितले. त्याला दाेन वर्षांनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करण्याची संधी अाहे. त्यासाठी गाैतम गंभीर हा कसाेटीत खेळण्यासाठी उत्सुक अाहे. त्याला कोलकाता कसोटीत संधी मिळाली नव्हती.

संभाव्य संघ
भारत :
विराट काेहली (कर्णधार), मुरली विजय, गाैतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, राेहित शर्मा, रहाणे, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, माेे. शमी, अमित मिश्रा, अश्विन, उमेश ठाकूर, जयंत यादव, शार्दूल ठाकूर, करुण नायर.

न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बाेल्ट, डग ब्रेसवेल, जितन पटेल, मार्टिन गुप्तिल, मॅट हेनरी, टाॅम लाॅथम, जेम्स निशाम, हेन्री निकाेलस, ल्युक राेंची, मिशेल सॅटनर, इश साेढी, राॅस टेलर, नील वेग्नर, वाल्टिंग.
बातम्या आणखी आहेत...