आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्वेंटी-२०: किवींनी घेतली \'फिरकी\', भारताचा अवघ्या ७९ धावांत खुर्दा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सुपर टेन गटातील पहिल्याच सामन्यात घरच्या प्रेक्षकांपुढे खेळण्याच्या दडपणाचे ओझे भारतीय फलंदाजांना सांभाळता आले नाही. फाजील आत्मविश्वासही भारताच्या अंगलट आला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऐन मोक्याच्या क्षणी दर्जेदार प्रदर्शन करून यजमान संघाला ४७ धावांनी पराभवाचा दणका देत विजयी सुरुवात केली. भारताच्या तुलनेत न्यूझीलंडनेही तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी केल्यामुळे त्यांच्या पारड्यात विजयाचे दान पडले. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांची "फिरकी' घेतली. नॅथन मॅक्लुमने २, सँटनरने ४ आणि ईश सोढीने ३ फलंदाजांना बाद करून विजयात योगदान दिले. न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हा पाचवा पराभव ठरला. आता १९ मार्च रोजी भारताचा पाकिस्तानसोबत सामना होईल.

विजयासाठी १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंिडयाची सुरुवातच सुमार राहिली. नॅथन मॅक्लुमने पहिल्याच षटकात शिखर धवनला, नंतर दुसऱ्या षटकात युवराजसिंगला स्वत:च्याच गोलंदाजीत झेलबाद करून भारताला दोन धक्के िदले. सँटनरने रोहित (५), रैनाला (१) तर ईश सोढीने कोहलीला (२३) बाद केले. भारताचे ४.५ षटकांतच २६ धावांत चार फलंदाज तंबूत परतले होते.

भारताचा हुकमी फलंदाज विराट कोहली पाचव्या गड्याच्या रूपात बाद झाला. २७ चेंडूंचा सामना करून दोन चौकारांच्या मदतीने विराट २३ धावांवर असताना सोढीच्या आॅफ स्पिनवर लूक राँचीने त्याचा यष्ट्यांमागे झेल घेऊन भारताला जबर हादरा िदला. यानंतर पंड्या (१), जडेजा (०) यांनी केवळ हजेरी दिली. अश्विन सोढीच्या गोलंदाजीत राँचीकरवी यष्टिचीत झाला तेव्हाच भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. धोनीने भारताकडून सर्वाधिक ३० चेंडूंत ३० धावा काढल्या. त्याने १ षटकार, १ चौकार मारला.
किवींच्या ७ बाद १२६ धावा
तत्पूर्वी, न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२६ धावा काढल्या. न्यूझीलंडकडून कोरी अँडरसनने सर्वाधिक ३४ तर ल्युक रोंचीने नाबाद २१ धावा काढल्या. सँटनरने १८ तर रॉस टेलरने १० धावा काढल्या. भारताकडून आर. अश्विन, नेहरा, बुमराह, सुरेश रैना आणि जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, धावफलक आणि खास आकडेवारी...