आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडविरूद्ध कसोटी: भारतीय संघ जाहीर; रोहित, धवन कायम; बिन्नी, ठाकूर संघाबाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वनडेच्या खेळाडूला कसोटीत अधिकाधिक संधी मिळाली पाहिजे, असे सांगत कर्णधार विराट कोहली रोहित शर्मासाठी हट्ट धरला. निवड समितीने त्याचा हट्ट पूर्ण केला. - Divya Marathi
वनडेच्या खेळाडूला कसोटीत अधिकाधिक संधी मिळाली पाहिजे, असे सांगत कर्णधार विराट कोहली रोहित शर्मासाठी हट्ट धरला. निवड समितीने त्याचा हट्ट पूर्ण केला.
मुंबई - सुमार फॉर्मात असतानासुद्धा रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची न्यूझीलंडविरुद्ध येत्या २२ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या तीन कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोमवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घाेषणा केली. अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर यांना संघाबाहेर करण्यात आले. बिन्नी आणि ठाकूर वेस्ट इंडीज दौऱ्यात सामील होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी आणि ५ वनडे होणार आहेत. न्यूझीलंड संघाच्या दौऱ्याला येत्या १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान दिल्लीत फिरोजशाह कोटला मैदानावर तीनदिवसीय सराव सामन्याने सुरुवात होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली कसोटी २२ पासून कानपूर येथे दुसरी कसोटी कोलकाता येथे तर तिसरी कसोटी इंदूरात होणार आहे.
खराब कामगिरीनंतरही रोहितला का दिली संधी?
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वोच्च धावसंख्या आहे. तरीही तो कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करू शकला नाही.
- 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध भारतात त्याने सलग दोन शतके ठोकून कसोटी करिअरची शानदार सुरुवात केली होती.
- रोहितजवळ अनेक चांगले स्ट्रोक आहेत. मात्र, तो कसोटीत सातत्य दाखवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे तो कसोटी संघात आपले स्थान मिळवू शकला नाही.
- 148 वन डे खेळलाला रोहित आतापर्यंत फक्त 18 टेस्ट खेळला आहे. त्याच्या नावावर दोन शतके आणि चार अर्धशतके आहेत.
- तर 32.62 सरासरीच्या त्याने 946 धावा काढल्या आहेत.
- वेस्ट इंडिज विरूद्ध तो दोन कसोटी खेळला पण काही कमाल करू शकला नाही.
- मात्र, त्याच्या आजच्या निवडीचे समर्थन करताना संदीप पाटील म्हणाले, रोहित एक मोठा खेळाडू आहे. त्याच्या भात्यात अनेक चांगले फटके आहेत. तो एक उत्तम कसोटी व तंत्रशुध्द फलंदाज आहे.
- मात्र, आजपर्यंत त्याला पुरेशी व सलगपणे संधी दिली गेली नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीत सातत्य नसले तरी त्याला पुरेशी संधी देण्याची गरज आहे.
- भारतीय संघाचे भविष्य पाहताना रोहितसारख्या टॅलेंट खेळाडूकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. त्याला पुरेशी संधी दिल्यानंतर त्याच्या कामगिरीचा आढावा घेता येईल.
- आपल्या माहितीसाठी की, रोहित शर्मासाठी कर्णधार रोहित कोहली आग्रही होता. त्याच्याकडे असलेले विविध फटके, भविष्यातील संघाची गरज व चांगला स्टाईक रेट आदी रोहितच्या जमेच्या बाजू कोहलीने निवड समितीपुढे मांडल्या.
शिखर धवनला संधी देताना गौतम गंभीरकडे दुर्लक्ष का केले?-
- भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला भारतीय कसोटी संघात पुन्हा सलामीवीर म्हणून स्थान दिले गेले आहे.
- शिखर धवन गेले काही दिवसांपासून लयीत नाही. शिवाय सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याला डच्चू मिळेल असे बोलले गेले.
- तसेच त्याला पर्यायी सलामीवीर म्हणून सध्या भन्नाट फॉर्मात असलेल्या गौतम गंभीरला संघात स्थान मिळेल असे सांगितले.
- मात्र तसे घडले नाही. सध्या सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीत गंभीरने 250 च्या पेक्षा अधिक धावा काढून आपला फॉर्म सिद्ध केला असला तरी भविष्याकडे पाहत निवड समितीने गौतम गंभीरकडे दुर्लक्ष केले.
- भारत पुढील सहा महिन्यात 13 कसोटी सामने खेळणार आहे.
- त्यामुळे शिखर धवनला पुरेशी संधी देतानाच युवा फलंदाज के. एल. राहुल याला कसोटी संघात स्थान दिले आहे.
निवड समितीने साधला समन्वय-
- नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात चेतेश्वर पुजारा व रोहित शर्मा विशेष कामगिरी करू शकले नाहीत.
- त्यामुळे निवड समिती या दोघांना डच्चू देऊ शकते अशी चर्चा होती. मात्र, पुजाराचे हेड कोच अनिल कुंबळे यांनी तर रोहित शर्माचे कर्णधार विराट कोहलीने समर्थन केले.
- रोहित शर्मासारक्या वनडेच्या खेळाडूला कसोटीत अधिकाधिक संधी मिळाली पाहिजे, असे कोहलीचे म्हणणे होते.
- तर अनिल कुंबळे यांनी पुजारा तिस-या क्रमांकावरच खेळेल व तो संघातील महत्त्वाचा सदस्य असल्याचे म्हटले होते.
- चेतेश्वर पुजाराने दुलीप करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आपण फॉर्ममध्ये परतल्याचे सिद्ध केले आहे.
- भारतातील खेळपट्ट्या व रोहित शर्माची वेगाने धावा करण्याची क्षमता पाहता रोहितला संधी मिळाली पाहिजे ही कोहलीचे म्हणणे निवड समितीने मान्य केले.
अशी आहे कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया...
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, शिखर धवन, आर. अश्विन, रिद्धीमन साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, उमेश यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, गंभीरकडे का करण्यात दुर्लक्ष, शिखरने का मारली बाजी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...