आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वन होण्याची संधी; अश्विनच्या बोटत वेदना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीला शुक्रवारपासून ईडन गार्डन स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. भारत मालिकेत सध्या १-० ने पुढे आहे. हा सामना जिंकून आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत नंबर वनचे स्थान मिळवण्याचे प्रयत्न भारताचे असेल. कोलकाता सामन्यात जखमी आर. अश्विन आणि लोकेश राहुलच्या जागी जयंत यादव आणि गौतम गंभीर यांना संधी मिळू शकते. दोन्ही संघांनी गुरुवारी ईडन गार्डनवर कसून सराव केला. अश्विनने गोलंदाजीचा सराव केला नाही. गौतम गंभीरने कमी सराव केला. टीम इंडियाने गोलंदाजीच्या सरावावर अधिक जोर दिला. न्यूझीलंडची पूर्ण टीम सरावासाठी एकत्र आली. त्यांनी खूप वेळ सराव केला. किवीज खेळाडू कोलकात्याच्या गरमीने त्रस्त दिसले.
दुसऱ्यांदा खेळपट्टी बनल्याने चिंता
घरच्या मैदानावर फिरकी हे भारताचे शक्तिस्थान आहे. ईडनच्या खेळपट्टीचा मूड कसा असेल, यामुळे टीम इंडियाचे व्यवस्थापन चिंतेत आहे. ईडनवर टीम इंडिया फक्त चार गोलंदाजासह खेळण्याची शक्यता कमी आहे. खेळपट्टी थोडी मोडल्यानंतर येथे अमित मिश्राला यश मिळू शकते.

अश्विनच्या बोटात वेदना : कानपूर येथे तिसऱ्या दिवशी अश्विन म्हणाला होता, ‘माझ्या बोटात वेदना असून मी गेले २५ दिवस जास्त गोलंदाजी केलेली नाही.’ असे म्हटल्यानंतरही त्याने मागच्या सामन्यात २२५ धावांत १० गडी बाद केले.
अश्विनच्या जागी यादव?
ऑफस्पिनर जयंत यादवने नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत अ संघाकडून अनौपचारिक कसोटीत ७ गडी बाद केले. २०१४-१५ रणजी ट्राॅफीमध्ये त्याने ३३ गडी बाद करून हरियाणाकडून गोलंदाजांच्या यादीत नंबर वनचे स्थान मिळवले होते. जयंत यादवसुद्धा अश्विनप्रमाणे फलंदाजीत माहीर आहे.
विराट कोहलीची बॅट शांत कशी?
सध्या टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची बॅट शांत आहे. मागच्या पाच डावांत त्याला १५ च्या सरासरीने केवळ ७८ धावा काढता आल्या आहे. कोलकात्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कोहलीची बॅट तळपेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
जितेन पटेल पोहोचला
वारविकशायरकडून कौंटी क्रिकेट खेळल्यानंतर न्यूझीलंडचा ऑफस्पिनर जितेन पटेल कोलकात्यात पोहोचला. त्याने कौंटीत ६९ बळी घेतले. न्यूझीलंडच्या फिरकीची जबाबदारी जितेन पटेल, ईश सोढी आणि मिशेल सँटनर पार पाडतील. जितेन पटेल बुधवारी मध्यरात्री भारतात आला.
दोन्ही संघ असे
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, उमेश यादव, जयंत यादव.
न्यूझीलंड : केन िवल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, जितेन पटेल, मार्टिन गुप्तिल, मॅट हेनरी, टॉम लॅथम, हेनरी निकोल्स, ल्युक रोंची, मिशेल सँटनर, ईश सोढी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बी.जे.वॉटलिंग.
बातम्या आणखी आहेत...