आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 वर्षांतली पाकविरुद्ध सहावी सुपर फायनल; 5 पैकी 4 सामन्यांत भारत विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामन्यापूर्वी शनिवारी, सरावादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली. - Divya Marathi
सामन्यापूर्वी शनिवारी, सरावादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली.
लंडन - भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ओव्हल मैदानावर समोरासमोर असतील. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकचा कर्णधार सरफराज आमने-सामने असतील.
 
दोन्ही देशांतील सर्वाधिक लोकप्रिय खेळ क्रिकेट आणि हॉकीत मिळून ६१ वर्षांत जागतिक पातळीवर दोन्ही देशांत हे सहावे ‘सुपर फायनल’ असेल. आतापर्यंत पाच महाफायनलमध्ये चार हॉकी आणि एक क्रिकेटचा समावेश आहे. हॉकीत दोन्ही संघ तीन ऑलिम्पिक फायनल (१९५६, १९६०, १९६४) आणि वर्ल्डकप फायनल (१९७५) खेळले आहेत. तीन ऑलिम्पिक फायनलपैकी दोन भारताने जिंकले आणि पाकने विजय मिळवला, तर हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती. क्रिकेटमध्ये जागतिक पातळीवर दोन्ही संघ २००७ मध्ये टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये समोरासमोर होते. त्यात भारताने विजय मिळवला होता. असे एकूण भारताने हॉकी आणि क्रिकेट मिळून पाकिस्तानविरुद्ध पाच जागतिक स्तराच्या फायनलपैकी चारमध्ये विजय मिळवला आहे. पाकने १९६० ऑलिम्पिक हॉकी फायनल जिंकले.  
 
- १३ सामन्यांत भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेत पाकविरुद्ध विजय मिळवला दोनमध्ये भारत पराभूत.   
- ०४ वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताची धडक.

दोन्ही संघ असे
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, दिनेश कार्तिक, मो. शमी, अजिंक्य रहाणे, उमेश यादव.

पाकिस्तान : सरफराज अहेमद (कर्णधार), अहेमद शहेजाद, अझहर अली, बाबर आझम, मो. हाफिज, शोएब मलिक, हसन अली, मो. आमेर, रुमान रईस, जुनैद खान, इमान वसीम, फहीम अश्रफ, शादाब खान, फखर जमान, हॅरिस सोहेल.

फलंदाजीत भारत, तर गोलंदाजीत पाक पुढे
> फलंदाजी
- या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने प्रती विकेट ९१.५० च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. पाकिस्तानची ही सरासरी ३५ अशीच आहे.  
- भारताच्या फलंदाजीचे रनरेट ६.२३ असे  होते, तर पाकिस्तानचे रनरेट केवळ ५.१५ असे आहे.  
 
> गोलंदाजी
- ३२.४४ च्या सरासरीने भारतीय गोलंदाजांनी या चॅम्पियन्स ट्रॉफीत आतापर्यंत बळी घेतले. ३१.७७ अशी पाकच्या गोलंदाजांची सरासरी.  
- ५.३२ च्या रनरेटने भारतीय संघाने या स्पर्धेत धावा दिल्या आहेत, पाकने ४.९९ च्या रनरेटने धावा दिल्या.

भारताच्या ८१% धावा टॉप-३ फलंदाजांच्या
- ८७४ धावा भारताकडून  धवन, विराट कोहली, रोहितने काढल्या आहेत. भारतीय संघातून एकूण ८१.४% अाहे. पाकच्या टॉप-३ फलंदाजांनी मिळून ४०६ धावा काढल्या.  
- ०५ मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कोहलीने पाकविरुद्ध १७  सामन्यात जिंकले आहेत. धोनीनेसुद्धा ५ मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकले. मात्र, धोनीला यासाठी ४५ सामने खेळावे लागले.  
- ०३ वेळा पाकच्या जुनैद खानने विराट कोहलीला बाद केले आहे. त्याने कोहलीला २२ चेंडूंत केवळ २ धावा काढू दिल्या.  

०६ हजार धावा काढणारी टीम बनेल टीम इंडिया : चॅम्पियन्स ट्राॅफीच्या इतिहासाबाबत बोलायचे झाल्यास टीम इंडियाने सर्वाधिक ५९९८ धावा काढून नंबर वनचे स्थान मिळवले, तर पाकने ४१५३ धावा काढून आठवे स्थान गाठले. यात भारताच्या खेळाडूंनी सर्वाधिक १० शतके ठोकली, तर पाकिस्तानकडून केवळ ३ शतके झाली.

रवींद्र जडेजाकडे सरफराजचा हिशेब चुकता करण्याची संधी
२००६ अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमध्ये पाकने कोलंबोत भारतावर ३८ धावांनी मात केली. त्या वेळी सरफराज अहेमद पाकचा कर्णधार होता. त्या वेळी भारतीय संघातील रवींद्र जडेजाने ३ गडी बाद केले होते. मात्र, भारताचा पराभव झाला. या वेळी जडेजाला हिशेब चुकता करण्याची संधी असेल.  

२००७ चे तीन हीरो अजूनही संघात : २००७ मध्ये टी-२० विश्वचषक फायनलमध्ये भारताने पाकला ५ धावांनी हरवले होते. त्या संघातील धोनी, युवराज आणि रोहित शर्मा आताच्या भारतीय संघातही आहेत, तर पाकचे हाफिज, मलिक आताच्या संघात आहेत.

बुमराह कंजूष गोलंदाज : २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वाधिक कंजूष गोलंदाज आहे. त्याने ४ सामन्यांत ३३ षटकांत ४.३० इकॉनॉमीने धावा दिल्या आणि ४ गडी बाद केले.
 
पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, 2007 टी-20 नंतर दोन्‍ही संघाची कामगिरी...
 
हेही वाचा,
बातम्या आणखी आहेत...