आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Pakistan Match At 27 Of February In Asia Cup

येत्या 27 फेब्रुवारीला रंगणार भारत-पाक काट्याची लढत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- येत्या 27 फेब्रुवारी राेजी पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत अाणि पाकिस्तान यांच्यात काट्याची लढत रंगणार अाहे. अागामी अाशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. येत्या 24 फेब्रुवारीपासून बांगलादेशात या स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेचे सामने 24 फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान मिरपूरच्या मैदानावर रंगणार अाहेत. एकूण ११ सामने या स्पर्धेत खेळवले जाणार अाहेत. पाकिस्तान टीमला भारतविरुद्ध सामन्यातून स्पर्धेतील माेहिमेला सुरुवात करण्याची संधी अाहे.

भारत-बांगलादेश सलामीची लढत
टीम इंडियाला यंदाच्या अाशिया चषकातील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी अाहे. २४ फेब्रुवारीपासून सुरू हाेणाऱ्या या स्पर्धेत भारत अाणि बांगलादेश यांच्यात सलामीचा सामना रंगणार अाहेे.