आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs SA Second Test Drawn, Third Test In Nagpur

बंगळुरू कसोटी ड्रॉ, चार दिवस चालला पावसाचा खेळ, आता लढाई नागपुरात !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- भारत आणि द. अाफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत बुधवारी पाचव्या दिवसाचा खेळसुद्धा पाऊस आणि ओल्या मैदानामुळे होऊ शकला नाही. अखेर पंचांनी सामना ड्रॉ घोषित केला. पाच दिवसांपैकी फक्त पहिल्या दिवशी बंगळुरूत खेळ होऊ शकला. दोन्ही संघांत आता २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान नागपूर येथे तिसरी कसोटी होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने सध्या १-० ने आघाडी घेतली आहे.

सामन्याच्या अखेरच्या दिवशी खेळ होण्याची आशा होती. सकाळी ११.३५ वाजता पंचांनी मैदानाची पाहणी केली. नंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. यानंतर बीसीसीआयने सामना ड्रॉ झाल्याची अधिकृत घोषणा िट्वट करून केली. "दुसरी कसोटी पूर्ण झाली. सामना ड्रॉ. मित्रांनो, बंगळुरूची कसोटी अधिकृतरीत्या ड्रॉ घोषित होत आहे,' असे बीसीसीआयने ट्विट केले.

या सामन्यात सलग चार दिवस पावसाने प्रभावित झाले. फक्त पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला. भारताने या सामन्यात द. आफ्रिकेला पहिल्या डावात २१४ धावांत गुंडाळले. यानंतर भारताने बिनबाद ८० धावा काढून सुरुवात केली. भारतीय टीम १३४ धावांनी मागे होती आणि मुरली विजय २८, तर शिखर धवन ४५ धावांवर खेळत होते. यानंतर पुढचा खेळ होऊ शकला नाही.

डिव्हिलर्ससाठी संस्मरणीय
हा सामना द. आफ्रिकेसाठी खास होता. कारण त्यांचा दिग्गज फलंदाज ए. बी. डिव्हिलर्सचा हा १०० वा कसोटी सामना होता. डिव्हिलर्सने या सामन्यात द. आफ्रिकेकडून पहिल्या डावात सर्वाधिक ८५ धावा काढल्या. अश्विनने १८ षटकांत ७० धावांत ४ विकेट, तर जडेजाने १६ षटकांत ५० षटकांत ४ विकेट घेतल्या.

संघात बदल नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) द. आफ्रिकेविरुद्ध फ्रीडम सिरीजच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियात बदल केला नाही. भारताचा १७ सदस्यीय संघ कायम आहे. भारतीय संघातून याआधीच उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, गुरकिरतसिंग यांना रणजी सामने खेळण्यासाठी रिलीज करण्यात आले आहे. दुसरी कसोटी ड्रॉ झाल्याने भारत मालिकेत १-० ने पुढे आहे.
अखेरच्या २ कसोटींसाठी भारतीय संघ असा
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, वरुण अॅरोन, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, गुरकिरतसिंग.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले हशिम अमला आणि कोहली...