आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs South Africa 2nd Test, 3 Day Loss Due To Rains

भारत - द. आफ्रिका दुसरी कसोटी: पावसामुळे तिसरा दिवसही पाण्यात !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसाेटीचा तिसरा दिवसही पाण्यात गेला. सलग दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साेमवारी खेळ हाेऊ शकला नाही. अागामी दाेन दिवसांवरही पावसाचे सावट निर्माण झालेले अाहे, असा इशारा हवामान विभागाने दिला अाहे. भारताने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर बिनबाद ८० धावा काढल्या अाहेत. भारताचे सलामीवीर मुरली विजय (नाबाद २८) अाणि शिखर धवन (नाबाद ४५) हे दाेघेही नाबाद अाहेत. तत्पूर्वी दक्षिण अाफ्रिका संघाने पहिल्या डावात २१४ धावा काढल्या अाहेत.

साेमवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली हाेती. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे मैदानावर माेठ्या प्रमाणात पाणी जमा झाले हाेते. तसेच या ठिकाणी खेळणेही अशक्य असल्याचे दिसून अाले. त्यामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात अाला. मागील अाठवड्यांपासून या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली अाहे. तसेच अागामी दाेन दिवस असेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

अमेरिकेच्या माइक - बाॅब ब्रायनविरुद्ध सामन्यादरम्यान सर्व्हिस करताना राेमानियाचा फ्लाेरिन मर्जिया व भारताचा राेहन बाेपन्ना.