आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs South Africa Ashwin\'s Career best Spins, India To Series Win

तिसऱ्या कसाेटीत अाफ्रिकेवर १२४ धावांनी मात; भारताने २-० ने जिंकली मालिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सामनावीर आॅफब्रेक गोलंदाज रविचंद्रन अश्विनने फिरकीची कमाल दाखवत घेतलेल्या १२ बळींच्या आधारे भारताने तिसऱ्या दिवशी शुक्रवारी नागपुरात मालिकेतील तिसऱ्या कसोटीत द. आफ्रिकेवर १२४ धावांनी दणदणीत मात करून चार सामन्यांच्या फ्रीडम (महात्मा गांधी-नेल्सन मंडेला) मालिकेत २-० ने विजय संपादन केला. ३१० धावांच्या प्रत्युत्तरात अाफ्रिकेचा १८५ धावांत खुर्दा उडाला. येत्या ३ डिसेंबरपासून मालिकेतील चौथी कसोटी दिल्लीत होईल.

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वातील भारताच्या फिरकीपटूंनी धारदार मारा करून तगड्या द. अाफ्रिकन फलंदाजांच्या नाकी दम आणत अगदी दोन्ही डावांत जखडून ठेवले. त्यामुळे मोहालीनंतर भारताला फिरकीपटूंच्या बळावर दुसरा विजय अन् मालिकेत यश मिळवता आले. अश्विनने आॅफब्रेक, कॅरमबाॅल अस्त्र वापरून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा घेतला. त्याने ९८ धावांच्या मोबदल्यात १२ फलंदाजांची शिकार केली. पहिल्या डावात डावखुरा आर्थोडाॅक्स (डाव्या हाताने पारंपरिक लेगस्पिन मारा) गोलंदाज रवींद्र जडेजाने भेदक गोलंदाजी करून ३३ धावांत चार, तर अमित मिश्राने दोन्ही डावांत एकूण ६० धावांत ४ बळी घेतले. या सामन्यात भारताकडून मुरली विजयने काढलेल्या ४० धावाच सर्वाधिक ठरल्या. त्यावरून खेळपट्टी फलंदाजीसाठी किती आव्हानात्मक होती, हे ध्यानात येईल. दुसऱ्या डावात जास्तीत जास्त वेळ पराभव टाळण्यासाठी द. आफ्रिकेला संथ फलंदाजी करावी लागली.
तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी चांगली सुरुवात केली. द. आफ्रिकेच्या धावसंख्येत ११ धावांची भर पडली असताना अश्विनने एल्गरला पुजाराकरवी झेलबाद केले. डीन एल्गर १८ धावा करून परत फिरला. त्यानंतर आलेल्या डिव्हिलियर्सलाही फार काही करता आले नाही. १८ धावांची भर घालून तोही चालता झाला. ९ धावांवर एबीला अश्विननेच पायचीत केले. आमला एकाकी झुंज देत हाेता. जेवणाच्या वेळी आफ्रिकेने १०४ धावा उभारल्या होत्या.
आमला-डुप्लेसिसची ७२ धावांची मोठी भागीदारी
तिसऱ्या कसोटीत दक्षिण अाफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमला अाणि फाफ डुप्लेसिस यांनी २८१ चेंडूंचा सामना करत १७३ मिनिटांत ७२ धावांची या सामन्यातील सर्वात मोठी भागीदारी केली. मात्र, त्यांचा टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी हाेऊ शकला नाही. अाफ्रिकेच्या हाशिम आमलाला ३९ धावांवर अमित िमश्राने गलीमध्ये उभ्या विराट कोहलीकडे झेल देण्यास बाध्य केले. त्यामुळे भारतीय संघाच्या मुरली विजयच्या नावे सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा राहिल्या. मुरलीने तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ४० धावा केल्या होत्या.
भारताचा विजय बघण्यासाठी गर्दी
आफ्रिकेविरुद्ध भारताच्या विजयाचे संकेत मिळाल्याने तिसऱ्या दिवशी सकाळी प्रेक्षकांनी सामन्याला चांगलीच गर्दी केली. सुमारे १५ हजार प्रेक्षक भारताचा मालिका विजय बघण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होते. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. सर्वत्र तिरंगा सन्मानाने फडकत होता. त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. मालिका विजयानंतर भारतीय संघाने जामठा स्टेडियमवर फोटोही काढून घेतला.
२००४-०५ नंतर यश
गत २००४-०५ नंतर यजमान भारतीय संघाला नंबर वन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यश मिळाले आहे. त्यामुळेच ही मालिका जिंकण्याची नामी संधी टीम इंडियाकडे आहे. भारताने ११ वर्षांनंतर मायदेशात द. आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी मिळवली अाहे.
विजयाची ध्येयपूर्ती
नागपुरातील कसोटी महत्त्वाची होती. त्यामुळे आम्ही विजयासाठी खेळलो. सर्व खेळाडूंनी रणनीतीनुसार खेळ करण्याचा प्रयत्न केला, त्यात आम्ही यशस्वी ठरलाे. द.आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय ही आमच्यासाठी ध्येयपूर्ती अाहे.
विराट कोहली, कर्णधार, भारत
टीका करणे योग्य नव्हे
विजयानंतर खेळपट्टीवर ताशेरे ओढणे योग्य आहे. मात्र, पराभूत झाल्यानंतर जर टीका केली तर त्यामुळे आम्ही फलंदाजीतील उणिवा झाकण्याचा प्रयत्न करतोय, असा संदेश बाहेर जाईल. खेळपट्टीवर मी टीका करणार नाही. आम्ही उणिवा शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न करू.
हाशिम आमला, कर्णधार, दक्षिण अाफ्रिका.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, सामनयातील काही क्षण व धावफलक..