आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs South Africa , Live Score, 2nd Test Match, India Vs South Africa 2015

विजयासाठी टीम इंडिया सज्ज, भारत- द.आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- सलामीच्या विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेला यजमान भारतीय संघ पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका टीमला पराभवाची धूळ चारण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीला शनिवारपासून बंगळुरूतील चिन्नास्वामी मैदानावर सुरुवात होणार आहे. सलग दुसऱ्या कसोटीतील विजयासह यजमान टीमला २-० ने मजबूत आघाडी घेता येईल.

भारताने सलामीची कसोटी जिंकून १-० ने आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे पाहुणा आफ्रिका संघ दुसऱ्या कसोटीत बाजी मारून मालिकेत विजयी ट्रॅकवर येण्यास उत्सुक आहे. त्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार होईल.

यजमान भारतीय संघ या कसोटीसाठी एक बदल करण्याची शक्यता आहे. या वेळी संघामध्ये ईशांत शर्माला पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. एका सामन्याच्या बंदीमुळे ईशांतला मोहाली कसोटीत खेळता आले नाही. त्यामुळे त्याला संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी उमेश यादव आणि वरुण अॅरोन यांच्यातील एकावर बाहेर बसण्याची वेळ येईल.
फलंदाजीमध्ये सध्या शिखर धवनची सुमार खेळी ही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरली आहे. मात्र, तरीही फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिखर धवनला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. तसेच विराट कोहलीचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी तो प्रयत्नशील राहण्याची शक्यता आहे.


वृत्तसंस्था
दुसऱ्या कसोटीच्या सुरुवातीच्या तीन दिवसांदरम्यान बंगळुरूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. गत आठवड्यात या ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. याचा फटका यजमान टीमला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याचा फटका या कसोटीला बसण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे.

आमलावर असेल दबाव
आफ्रिकेच्या फलंदाजांना आता टीम इंडियांच्या फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. पहिल्या कसोटीत कर्णधार हाशिम आमलासह डुप्लेसिससारखे अव्वल फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे आता या दोन्ही फलंदाजांवर दुसऱ्या कसाेटीत माेठ्या खेळीसाठी मोठा दबाव असेल. या दाेघांकडून संघाला माेठी अाशा अाहे.

संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, वरुण अॅराेन, उमेश यादव, राेहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, गुरकिरत सिंग.

दक्षिण आफ्रिका : हाशिम अामला (कर्णधार), ए.बी. डिव्हिलर्स, डिन एल्गर, फाफ डुप्लेसिस, टेम्बा बवुमा, जेपी ड्ुमिनी, वान जाल, डेन विलास, पिइडेट, सिमाेन हार्मर, इम्रान ताहिर, डेल स्टेन, माेर्ने माेर्केल, कायले एबाेट, कागिसाे रबाडा.

डिव्हिलर्सचे कसाेटीचे अाज शतक
दक्षिण अाफ्रिकेचा स्टार डिव्हिलर्स शनिवारी अापल्या करिअरमधील १०० वी कसाेटी खेळणार अाहे. त्याने १७ डिसेंबर २००४ राेजी कसाेटी करिअरला सुरुवात केली. इंग्लंडविरुद्ध अांतरराष्ट्रीय स्तरावर कसाेटीत त्याला पर्दापण करण्याची संधी मिळाली. त्याने ९९ कसाेटींत ५१.९२ च्या सरासरीने एकूण ७ हजार ६८५ धावा काढल्या अाहेत. यामध्ये २१ शतके व ३७ अर्धशतकांचा समावेश अाहे.

अाफ्रिका टीमला धक्का; जखमी फिलेंडर, स्टेन बाहेर
सलामीच्या पराभवाने भारतविरुद्ध कसाेटी मालिकेत पिछाडीवर पडलेल्या दक्षिण अाफ्रिका टीमला जबर धक्का बसला. या टीमचा गाेलंदाज वेर्नाेन फिलेंडर अाणि डेल स्टेन गंभीर दुखापतीमुळे अाता मालिकेतून बाहेर झाले अाहेत. फिलेंडरच्या जागी संघामध्ये वेगवान गाेलंदाज कायले एबाेटला सहभागी करण्यात अाले. शनिवारपासून भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसाेटीला प्रारंभ हाेत अाहे. या दुसऱ्या कसाेटीच्या पार्श्वभूमीवर फिलेंडरचे बाहेर पडणे अाफ्रिका टीमला अधिकच महागात पडू शकते. डेल स्टेनला माेहाली कसाेटीदरम्यान दुखापत झाली हाेती. मात्र, अद्याप ताे पूर्णपणे दुखापतीमधून सावरू शकला नाही. त्याचा फटका टीमला बसण्याची शक्यता अाहे. मात्र, एबाेटकडून संघाला माेठी अाशा अाहे. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या अाफ्रिकेला त्याचा फायदा हाेईल.