आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-अाफ्रिका कसाेटीचा दुसरा दिवस ‘पाण्यात’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसाेटीचा दुसऱ्या दिवशीचा खेळ रविवारी पावसामुळे हाेऊ शकला नाही. त्यामुळे माेठ्या अाघाडीच्या यजमान भारतीय संघाच्या खेळाडूंच्या अाशेवर पाणी फेरले गेले.

कसाेटी सुरू हाेण्यापूर्वी राज्याच्या हवामान विभागाने या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली हाेती. त्यानुसार रविवारी सकाळीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसाचा खेळ हाेऊ शकला नाही. भारताने पहिल्या दिवसअखेर बिनबाद ८० धावा काढल्या. मुरली विजय (२८) व धवन (४५) हे खेळत अाहेत.