दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे दोन वन डे आणि चार टेस्ट मॅचच्या सीरीजसाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. रविवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्या वन डेमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडिया बॅकफुटवर आहे. दक्षिण आफ्रिका सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. या परिस्थितीत आता सिरीज जिंकायची असेल तर आज दुपारी 2 वाजता होणार्या बैठकीत सिलेक्टर्सला टीममधील सहभागी खेळाडूंविषयी लक्षपूर्वक विचार करावा लागेल.
युवराजसिंगला संधी मिळणार का...
हरभजनसिंग आणि अमित मिश्रासारख्या जुण्या खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सिलेक्टर्स युवराजसिंगच्या बाबतीत विचार करणार की नाही, हे पाहावे लागेल. रविवारी युवराजने रणजी सीजनमध्ये गुजरातविरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली. त्याने 233 बॉल्समध्ये 187 धावा ठोकल्या. या इनिंगमध्ये त्याने 7 सिक्सर आणि 14 चौकार लगावले. त्याच्या या खेळीनंतर त्याच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावरून सुवराजला संघात घेण्याची मागणी केली आहे.
युवीने व्यक्त केली होती, टीममध्ये पुनरागमनाची इच्छा
काही दिवसांपूर्वी युवराजसिंगने टीम इंडियात पुनरागमनाची इच्छाही व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, तो जोपर्यंत खेळाचा आनंद घेत आहे, तोपर्यंत खेळत राहील. जर 2016 मध्ये भारतात होणार्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे.
युवराजची कारकिर्द
फॉरमॅट |
मॅच |
रन |
हायएस्ट स्कोर |
अॅव्हरेज |
स्ट्राइक रेट |
100 |
50 |
विकेट्स |
टेस्ट |
40 |
1900 |
169 |
33.92 |
57.97 |
3 |
11 |
9 |
वनडे |
293 |
8329 |
139 |
36.37 |
87.24 |
13 |
51 |
111 |
टी-20 |
40 |
968 |
77* |
31.22 |
144.69 |
0 |
8 |
23 |
फर्स्ट क्लास |
121 |
7919 |
209 |
45.25 |
24 |
34 |
37
|