आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs South Africa Test Series: Raining Also 4th Day

Ind VS SA Test: चौथ्या दिवसाचा खेळही "पाण्यात'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - भारत आणि द. आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळही ओले मैदान आणि रिमझिम पावसामुळे होऊ शकला नाही. जेवणाच्या वेळेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही. पंचांनी बऱ्याच वेळा मैदानाची पाहणी केल्यानंतर जवळपास अडीच वाजता चौथ्या दिवसाचा खेळही रद्द झाल्याची घोषणा केली. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सकाळी जागोजागी पाणी साचलेले होते. मैदान खूप ओले होते. खेळपट्टी कव्हरने झाकलेली होती. पंचही वारंवार मैदानाची पाहणी करत होते. वातावरण, मैदानाची स्थिती बघून पंचांना खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.


दरम्यान, मैदानावर पाऊस थांबलेला असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर. अश्विन, वृद्धिमान साहा आदी खेळाडूंनी फुटबॉल खेळून आनंद लुटला.