आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Sri Lanka, 1st Test 4th Day, Shri Lanka Wine

जिंकता जिंकता हरलो, कॅप्टनसीवर प्रश्नचिन्ह, हा ठरला मॅचचा टर्निंग प्वॉइंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांडीमलच्या शॉटपासून बचावाचा प्रयत्न करताना रोहित शर्मा. - Divya Marathi
चांडीमलच्या शॉटपासून बचावाचा प्रयत्न करताना रोहित शर्मा.
श्रीलंकेबरोबर असलेल्या नियोजित 3 कसोटी सामण्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने भारताचा 63 धावांनी पराभव केला. श्रीलंकेला पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने 183 धावांवर ऑल आउट केले होते. टीम इंडियाने 375 धावा करत 192 धावांची घाडी घेतली. या नंतर श्रीलंकेच्या दूसर्‍या डावात मॅन ऑफ द मॅच ठसलेल्या चंडीमल याने शानदार नाबाद 162 धावांची खेळी केल्याने श्रीलंकेला 367 करता आल्या आणि भारता समोर जिंकण्यासाठी 176 धावांचे लक्ष ठेवता आले. मात्र या छोटेखानी लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 112 धावांतच तंबूत परतला. रंगना हेराथने 48 धावा देत भारताचे सात फलंदाज बाद केले आणि श्रीलंकेचा विजयाचा मार्ग खुला केला. हा भारतीय संघाचा 200 किंवा त्यापेक्षा कमी धावांचा पाठलाग करताना झालेला दुसरा पराभव आहे. या आधी 1997 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला हेता.
विराटच्या कॅप्टनसीवर प्रश्न चींन्ह?
मॅचमध्ये अनेक गोष्टींवरून विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. यात, चेतेश्वर पुजारा असतानाही नियमित फ्लॉप होत असलेल्या रोहित शर्माला संघात का सामील केले? हे कळूशकलेले नाही. रोहित शर्मा बांग्लादेशातही फ्लॉप ठरला होता. तेव्हा सिनिअर खेळाडूंनीही टीम सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दुसरे असे की, श्रीलंकेचा पहिला डाव लवकर संपल्यानंतर दुसर्‍या डावात डिफेंसिव्ह खेळणे विराटला महागात पडले. पाच फलंदाज लवकर बाद होऊनही श्रीलंकेला 367 धावांपर्यंत मजल मारता आली. या बाबतीत तर, माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनीही भारतीय गोलंदाना धारेवर धरले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमका काय ठरला मॅचचा टर्निंग प्वॉइंट...